हिंगोली शहरात दामिनी पथकाच्या ३५ ठिकाणी भेटी
हिंगोली (Hingoli Damini squad) : दामिनी पथकाने मागील आठवड्यात १९ ते २५ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत हिंगोली जिल्ह्यातील शाळा व इतर ३५ महत्वाच्या ठिकाणी भेटी दिल्या असून भारतीय विद्या मंदिर हिंगोली या ठिकाणी विनाकारण फिरणार्या व सार्वजनिक शांतता भंग करणार्या दोन टवाळखोरांना (Hingoli Damini squad) दामिनी पथकाने ताब्यात घेवुन त्यांच्यावर कारवाई केली. १ अल्पवयीन असल्याने त्याला नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस निरीक्षक शालीनी नाईक, आरती साळवे, अर्चना नखाते, चंद्रशेखर देशमुुख व चिलगर यांनी कामगिरी केली आहे.
विद्यार्थी व पोलीसामध्ये साधला सुसंवाद
सेनगाव व नर्सी नामदेव जिल्हा परिषद शाळेमध्ये स्टुड पोलीस कॅडेट हा कार्यक्रम राबवुन स्टुड आणि पोलीस यांच्यावर सुसंवाद साधून विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून कायद्या विषयक महिला व मुलांची सुरक्षा तसेच महिलेवर अत्याचाराबाबत सविस्तर माहिती दिली. बाल विवाह प्रतिबंध, गुन्हे प्रतिबंध तसेच संंकट कालीन सोबती डायल ११२ या आपत्तकालीन नंबर बाबत माहिती दिली. जेष्ठ नागरिकांंना करावयाची मदत तसेच कवायतींची माहिती देवुन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. वाहतुक नियम, ऑनलाईनद्वारे होणारी फसवणुक, तसेच संकट काळात महिला व मुलींना मदत करणारे (Hingoli Damini squad) जिल्हा दामिनी पथकाबाबत माहिती दिली. शाळा, महाविद्यालय यासह इतर सार्वजनिक ठिकाणी महिला, विद्यार्थीनीची कोणीही छेड काढल्यास त्यांनी हेल्पलाईन ८००७०००४९३ तसेच डायल ११२ सेवेवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.