हिंगोली/हाताळा (Hingoli):- सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील ३५ वर्षीय व्यक्ती हा हाताळा येथील जावई असून गुरूवारी दुपारच्या सुमारास त्याने आपल्या नातेवाईकास आत्महत्या (Suicide) करीत असल्याचा भ्रमणध्वनी करून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हाताळा शिवारात घडली.
घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच नवनाथने आत्महत्या केली होती
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील नवनाथ रामकिसन जाधव (३५) हे हाताळा येथील जावई आहेत. मागील काही कालावधी पासून पुणे येथे एका कंपनीमध्ये कार्यरत आहेत. २६ सप्टेंबर रोजी ते गोरेगाव येथे आले असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. यानंतर त्याने हाताळा शिवारात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे नवनाथ जाधव याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पुतण्याला भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यावरून पुतण्याने आपल्या काकाला याची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ गोरेगाव पोलिसांना संपर्क साधला होता. मोबाईलच्या (Mobile)लोकेशन नुसार पोलिस निरीक्षक एस.पी.डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके, मंचक ठाकरे, अनिल भारती हे घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच नवनाथने आत्महत्या केली होती. मृतदेह (Dead Body) गोरेगाव येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी (Autopsy) पाठविण्यात आला. नवनाथच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ असा परीवार आहे.