हिंगोली (Hingoli Death) : सेनगाव तालुक्यातील (Sengaon Taluka) खांबा सिनगी परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास झालेल्या पावसात वीज पडल्याने (farmer Death) ६५ वर्षीय वयोवृद्ध शेतकर्याचा मृत्यू झाला असून तीन महिला जखमी झाल्याने त्यांच्यावर सेनगाव येथील (Hingoli Hospital) शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आला. (Hingoli District) हिंगोली जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या दिवशीच पावसाने हजेरी लावली. ११ जूनला सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने नदी, नाले, ओढ्यांना वाहते पाणी आले. (Heavy Rain) पावसाळ्यातील पहिलाच जोरदार पाऊस झाल्याने शेतकर्यांनी खरीपाच्या पेरणी करीता लगबग सुरू केली. काही शेतकरी आणखी एका पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. १४ जून शुक्रवार रोजी सेनगाव तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली.
सेनगाव तालुक्यातील खांबा सिनगी येथील घटना
सेनगाव तालुक्यातील (Sengaon Taluka) सिनगी खांबा येथील वामन सोनाजी लोणकर (६५) यांच्यासह रूख्मिनाबाई वामन लोणकर, सुमन संभाजी अंभोरे, जिजाबाई मुंजाजी पवार व इतर काहीजण पानकनेरगाव शिवारात संभाजी निवृत्ती अंभोरे यांच्या शेतामध्ये गेले होते. शेतीतील काम सुरू असताना अचानक दुपारी ३ वाजेच्या सुमारास पाऊस (Heavy Rain) आल्याने त्यांनी झाडाखाली आश्रय घेण्याकरीता धाव घेतली. याचवेळी वीज कडाडून कोसळल्याने वामन सोनाजी लोणकर (farmer Death) यांचा जागीच मृत्यू झाला तर रूख्मिनाबाई लोणकर, सुमन अंभोरे व जिजाबाई पवार हे दोघे जखमी झाल्याने त्यांना सेनगाव येथील (Hingoli Hospital) ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.