वसमत/हिंगोली(Hingoli):- उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे(Nationalist Congress) राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांची जनसन्मान यात्रा बुधवारी वसमत मध्ये येणार आहे. या निमित्ताने वसमत येथे शेतकरी मेळावा, महिला व युवकांशी संवाद आणि भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर सभेसाठी व शेतकरी (Farmer) मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी महिला भगिनींनी व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार राजू पाटील नवघरे यांनी केले आहे.
शेतकरी मेळावा, महिला युवक संवाद आणि भव्य जाहीर सभेचे आयोजन
वसमत येथील मयूर मंगल कार्यालयात सोमवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते 28 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा वसमत येथे दाखल होणार आहे. यात्रेचे स्वागत करण्यासाठी व जाहीर सभेच्या तयारीसाठी वसमत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. अतिविराट जाहीर सभा घेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित झाली आहे. रक्षाबंधनापूर्वी योजनेचे दोन हप्ते बहिणींच्या खात्यात वर्ग झाले आहेत या सर्व बहिणींचा सन्मान करण्यासाठी आणि अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही. अशा सर्व उर्वरित बहिणींना या योजनेत सहभाग नोंदवून घेण्यासाठी अजितदादा पवार यांची जनसन्मान यात्रा निघाली आहे. तसेच राज्यातील शेतकरी व युवकांच्या कल्याणासाठीच्या विविध योजना शासनाने कार्यान्वित केल्या आहेत. या योजनांचा लाभ आणि माहिती युवक, शेतकरी व सर्वसामान्यांना देण्यासाठी जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
वसमत येथे ही जन सन्मान यात्रा 28 ऑगस्ट रोजी येणार आहे. या यात्रेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह मान्यवर सहभागी होणार आहेत.
अजित दादा पवार यांचे भव्य स्वागत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला
वसमत येथे पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच अजितदादा पवार येणार असल्याने वसमत विधानसभा मतदारसंघाच्या (Assembly constituencies) वतीने अजित दादा पवार यांचे भव्य स्वागत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला आहे. त्या दृष्टीने जंगी तयारी करण्यात आली आहे. बक्षीस स्थापन नंतर पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच अजित दादा पवार यांची जाहीर सभा असल्याने या जाहीर सभेत अजित दादा पवार काय बोलतात. या संदर्भातही नागरिक शेतकरी व कार्यकर्त्यांना उत्कंठा आहे. सभा यशस्वी करण्यासाठी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या आहेत. प्रत्येक सर्कल निहाय बैठका पार पडल्या असून प्रत्येक गावातून नागरिक या सभेला येणार असल्याने ही सभा अति विराट होईल अशी अपेक्षा आहे. अजित दादा पवार (Ajit Pawar) यांच्या स्वागतासाठी येणाऱ्या माता भगिनी यांची गर्दी युवक शेतकरी व ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिक शहरी नागरिक यांची संभाव्य होणारी गर्दी पाहता वसमत येथील सभेसाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सभा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा नागरिक शेतकरी युवक महिला भगिनी व ग्रामस्थांनी या सभेसाठी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार राजू पाटील नवघरे यांनी केले आहे.
पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच अजितदादा वसमत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार या पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादा पवार हे वसमत दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यात मोठा उत्साह पाहावयास मिळत आहे वसमत मध्ये होणारी ही सभा प्रचंड मोठी करण्याचा निर्धार राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी केला असून सभेची सर्व तयारी आमदार राजू पाटील नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे