हिंगोली (Hingoli Deputy Collector) : उप जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांच्या प्रशासकीय व विनंतीनुसार बदल्याचे आदेश शासनाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी काढले असून जिल्ह्यातील एका (Hingoli Deputy Collector) उप जिल्हाधिकार्यांसह तीन उपविभागीय अधिकार्यांचा या बदल्यामध्ये समावेश आहे. (Revenue Administration) महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्यांना शासनाने हिरवी झेंडी दाखविल्यानंतर ३ ऑगस्टला उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या महसूल व वन विभागाने केल्या आहेत.
ज्यामध्ये हिंगोलीचे (Hingoli Deputy Collector) उपविभागीय अधिकारी उमाकांत सिताराम पारधी यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर उपविभागीय अधिकारीपदी, वसमतचे उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांची नांदेड उपविभागीय अधिकारीपदी, कळमनुरी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांची नांदेड जिल्ह्यातील बिलोली उपविभागीय अधिकारीपदी तर उपजिल्हाधिकारी (सामान्य) समाधान घुटूकडे यांची उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या बदलीने रिक्त होणार्या पदावर हिंगोलीत बदली करण्यात आली आहे.