नागरीकांना घरबसल्या तकार नोदंविण्याची सुविधा
हिंगोली (Hingoli District Police) : जिल्ह्यात मुख्यमंत्री यांचे १०० दिवसांचे कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ (www.hingolipolice.gov.in) अद्ययावत करून नागरीकांना सहजासहजी घरबसल्या पोलीस मदत मिळण्याकरीता सुविधा संकेतस्थळाचे माध्यमातुन उपलब्ध करून दिली आहे.
हिंगोली पोलिस दलाने (Hingoli District Police) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर (Website) नव्याने सुधारणा केल्या आहेत. या अद्ययावत संकेतस्थळामध्ये नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेषतः नागरिकांना घरबसल्या काही महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेता यावा या उद्देशाने “Lost and Found” (सापडलेल्या व हरवलेल्या वस्तू), “Tenant Report” (भाडेकरू माहिती), “Citizen Alert Wall” (नागरिक सतर्कता संदेश) तसेच महत्त्वाचे क्रमांक, संकेतस्थळ, हरवलेली व्यक्ती, अनोळखी/सापडलेला मृतदेह, एफआयआर, चोरीची व सापडलेली वाहने, महिला सुरक्षा आणि ज्येष्ठ नागरिक यांसारख्या अद्ययावत टॅब्स नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
“Lost and Found” या सुविधेमुळे नागरिकांना हरवलेल्या वस्तूंची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविता येणार असून, सापडलेल्या वस्तूंची माहिती देखील सहजरीत्या तपासता येणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचणार असून, त्यांची हरवलेली महत्त्वाची कागदपत्रे, वस्तू किंवा साहित्य सहजपणे शोधणे शक्य होणार आहे. “Tenant Suvidha” या सुविधेमुळे नागरिकांना घरभाडेकरूंची माहिती ऑनलाइन स्वरूपात नोंदविता येणार आहे. यामुळे (Hingoli District Police) पोलिसांना परिसरातील भाडेकरूंची माहिती त्वरित उपलव्ध होणार असून, सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होणार आहे.
“Citizen Alert Wall” या सुविधेमुळे नागरिकांना महत्त्वाच्या सूचना, सतर्कतेचे संदेश आणि सुरक्षाविषयक माहिती त्वरित मिळू शकेल. यामुळे नागरिकांना ताज्या घडामोडींची माहिती घरबसल्या मिळू शकते. हिंगोली पोलिस दल नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी सदैव तत्पर असून, या नव्या सुविधा नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन (Hingoli District Police) हिंगोली पोलिस दलाने केले आहे.