जिल्ह्यात अवैध व्यसाय विरोधी अभियान १
हिंगोली (Hingoli district raid) : जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर १५ ते २१ मे दरम्यानच्या कालावधीत पोलिसांनी १०५ ठिकाणी छापे मारून १०६ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून १० लाख ८६ हजार ८४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
१ ते ३१ मे दरम्यान नांदेड परिक्षेत्रात अवैध व्यवसाय विरोधी अभियान १ चे आयोजन विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे. त्या निमित्त जिल्ह्यातील अवैध दारू, मटका जुगार, ऑनलाईन लॉट्री, क्रिकेट सट्टाबाजी, गुटखा, अमली पदार्थ, वेश्या व्यवसाय, वाळू उपसा व वाहतुक, अवैध प्रवाशी वाहतुक आदींवर आळा घालण्याच्या सुचना शहाजी उमाप यांनी दिल्या आहेत. त्या निमित्ताने जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी अंबादास भुसारे, सुरेश दळवे, राजकुमार केंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्यासह जिल्ह्यातील १३ ही पोलिस ठाण्यातील अधिकार्यांनी १५ ते २१ मे दरम्यानच्या कालावधीत अनेक ठिकाणी अवैध धंद्यावर छापे मारले. ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात १०५ ठिकाणी छापे मारून १०६ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून १० लाख ८६ हजार ८४५ रुपयाचा (Hingoli district raid) मुद्देमाल जप्त करण्यात आला. या छाप्यांमुळे अवैध व्यवसायीकांची घाबरगुंडी होत आहे.
आपल्या भागातील अवैध (Hingoli district raid) व्यवसायांची माहिती, नागरिकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यास अथवा पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या संकेतस्थळावर कळवून अशा अवैध व्यवसायांचा बिमोड करण्यासाठी आपला हातभार लावावा, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.