हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव आरोग्य संस्थेला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन पुरस्कार
हिंगोली (Hingoli district) : दि.२६ वसमत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र गिरगावने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन कार्यक्रम अंतर्गत दिल्लीस्थित केंद्रीय आरोग्य संस्था ‘राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था संसाधन केंद्रा’च्या निर्धारित निर्देशांक पूर्ततेचे विशेष परीक्षण केंद्रीय गठीत समितीमार्फत करण्यात आले. हे केंद्रीय परीक्षण २४ व २५ जानेवारी रोजी झाले. या (Hingoli district) परीक्षणामध्ये राजस्थानचे केंद्रीय परीक्षक डॉ. किरण नागपाल अणि मध्यप्रदेश येथील केंद्रीय परीक्षक श्रीमती अकीला अन्सारी यांनी मुद्देनिहाय परीक्षण करून केंद्रीय समितीस अहवाल सादर केला.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
या अहवालानुसार गिरगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने छत्रपती संभाजीनगर विभागातून क्रमांक पटकावला. गिरगावने विभागातून ९५ टक्के गुण प्राप्त करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन केंद्रीय महत्त्वाकांक्षी पुरस्कार प्राप्त केला. छत्रपती संभाजीनगर विभागातून प्रथम व महाराष्ट्रातून सर्वाधिक गुणांकन व मानांकनाचा बहुमान प्राप्त करणारी गिरगाव ही एकमेव आरोग्य संस्था ठरली आहे. त्याबद्दल राज्यस्तरावरून गिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
आरोग्य क्षेत्रातील हे उच्चस्तरीय मानांकन प्राप्त झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानून समाधान व्यक्त केले आहे. याचे खरे श्रेय गिरगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक कदम, डॉ. वैजनाथ सूर्यवंशी व संपूर्ण कर्मचारी चमूच्या अथक परिश्रमाचे फलित असल्याचे (Hingoli district) जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार यांच्या परिश्रमाचे यश आहे.
हे उच्चस्तरीय मानांकन प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे वेळोवेळी प्रेरणादायी मार्गदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तसेच (Hingoli district) जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोपाल कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग फोपसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे, डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. गजानन चव्हाण, डॉ. डी. व्ही सावंत, डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश्वर कत्रुवार, डॉ. विनोद आतुरकर, डॉ. ताटेवाड, डॉ. जाधव यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.