इतर जिल्ह्याची मंत्रिपदासाठी लॉबींग
हिंगोली (Maharashtra cabinet expansion) : राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूर येथे झाला. राज्याच्या मंत्रिमंडळात यंदा एखाद्या तरी मंत्रिपद मिळेल अशी दाट शक्यता असताना जिल्ह्याला माहितीने दुसर्यांदाही हुलकावणी दिली आहे.
महाराष्ट्रात झालेल्या नुकत्याच (Maharashtra cabinet expansion) विधानसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल दिला. यामध्ये हिंगोली मतदारसंघातून भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे, कळमनुरी मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर तर वसमत विधानसभा मतदारसंघातून अजित दादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू भैया नवघरे यांना मतदारांनी निवडून दिले मागील वेळच्या निवडणुकीतही हे तिन्ही आमदार निवडून आले होते.
यामध्ये भाजपचे आमदार मुटकुळे हे तिसर्यांदा तर शिवसेनेचे संतोष बांगर आणि राष्ट्रवादीचे राजू भैया नवघरे हे दुसर्यांदा निवडून आलेले आहेत. यंदाच्या निवडणुकीत तीनही आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत. अशावेळी या मंत्रिमंडळात एखादे तरी मंत्रिपद निश्चित मिळेल अशी दाट शक्यता हिंगोली जिल्हा वाशीयांना होती; परंतु १५ डिसेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये हिंगोली जिल्ह्याला एकही मंत्रिपद मिळाले नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांची नाराजी व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून दिले; परंतु (Maharashtra cabinet expansion) मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नसल्याने नागरिकांतून नाराजीचा सुर उमटत आहे.
यापूर्वी डॉ. मुंदडा व दांडेगावकरांना मिळाले होते राज्यमंत्रीपद
हिंगोली जिल्ह्यात यापूर्वी शिवसेना भाजपा युतीची सत्ता आल्यावर सन १९९५ ते २००० दरम्यान डॉक्टर जयप्रकाश मुंदडा हे सहकार राज्यमंत्री होते तर राष्ट्रवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेसच्या सत्तेमध्ये जयप्रकाश दांडेगावकर यांना सन २००४ ते २००९ दरम्यान सहकार राज्यमंत्रीपद देण्यात आले होते. त्यानंतरच्या मंत्रिमंडळात एकदाही हिंगोली जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला; परंतु नुकत्याच झालेल्या (Maharashtra cabinet expansion) विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीचे तिन्ही उमेदवार निवडून दिलेले असताना तिन्ही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी हिंगोली जिल्ह्याला मंत्रीपद दिले नसल्याने मतदारांची घोर निराशा झाली आहे.