हिंगोली (Hingoli District Police) : जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी १४ ऑगस्टला पदभार स्विकारला आहे. शासनाच्या गृह विभागाने राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्याबाबत १३ ऑगस्टला आदेश काढले होते. ज्यामध्ये (Hingoli District Police) हिंगोलीच्या जिल्हा पोलिस अधिक्षक पदी श्रीकृष्ण कोकाटे (Srikrishna Kokate) यांची नियुक्ती करण्यात आली. १४ ऑगस्ट रोजी पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे आगमन जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात झाल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अनेक पोलिस अधिकारीही उपस्थित होते.