हिंगोली (Hingoli earthquake) : जिल्ह्यात बुधवारी सकाळच्या सुमारास भुकंपाचा धक्का (Magnitude earthquake) जाणवल्याने अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली होती. ४.५ रिश्टर स्केलचा हा भुकंपाचा हादरा असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामध्ये कुठेही जिवीत अथवा वित्त हानी झाली नसल्याचे माहितीही देण्यात आली. मागील काही वर्षापासून (Hingoli earthquake) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ या तीन तालुक्यात भुगर्भातून वारंवार गूढ आवाज येण्याचा नित्याचाच प्रकार घडत होता. यामुळे या भागातील ग्रामस्थ नेहमीच भयभीत असताना १० जुलै बुधवार रोजी सकाळी ७.१४ मिनिटांनी भुकंपाचा ४.५ रिश्टर स्केलचा हादरा बसला.
हिंगोली जिल्ह्यात ४.५ रिश्टर स्केल भुकंपाचा जाणवला धक्का
अनेकांना हा (Hingoli earthquake) भुकंपाचा धक्का जाणवल्याने घरातील महिलांसह पुरूष व त्यांच्या मुलांबाळांनी घराबाहेर धाव घेतली. या भुकंपामुळे कळमनुरी तालुक्यातील पेठवडगाव येथील पुरातनकालीन किल्ल्याच्या बुरूजाचा काही भाग कोसळला तर निमटोक या गावात एका घराला भुकंपाच्या धक्क्यामुळे तडे गेले आहेत. कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा हे भुकंपाचे केंद्र आहे. जिल्ह्यात जाणवलेला भुकंपाचा धक्का हा सौम्य स्वरूपाचा असल्याने कुठेही जिवीत अथवा वित्त हानी झाली नाही. अधुनमधून भुकंपाचे हादरे बसत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
भुकंपाच्या धक्क्याने पुन्हा एकदा जिल्हा हादरला
बुधवारी सकाळी ७.१४ वाजता भुकंपाचा धक्का (Hingoli earthquake) जाणवला असून त्याचे केंद्रबिंदू कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा हे आहे. जिल्ह्यात जाणवलेले भुकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झाले नाही. एकीकडे सकाळच्या वेळी अनेक घरातील नागरीक झोपेतून उठलेले होते. नित्य नेमाचे कामकाज चालू असताना अचानक सकाळी ७.१४ वाजता (Magnitude earthquake) भुकंपाचा हादरा बसल्याने घरातील अनेक नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. नागरीक चांगलेच घाबरले होते. मराठवाड्यातील हिंगोलीसह परभणी आणि नांदेडमध्येही सकाळी भुकंपाचा धक्का जाणवला आहे.
पत्र्यावरील दगड काढून घ्यावेत
अनेक नागरिकांनी आपल्या घरावर टाकलेल्या पत्रांवर आधारासाठी दगड ठेवलेले आहेत. अशा (Hingoli earthquake) भुकंपाच्या धक्क्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी घरावरील दगड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.