हिंगोली (Hingoli Election) : नुकत्याच झालेल्या (Lok Sabha elections) लोकसभा निवडणूकीत काँग्रेसच्या नेत्या आ. प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांनी आपल्या विरोधकांची मदत केली, अशी तक्रार नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil) यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
खा. नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसच्या पक्ष श्रेष्टीकडे केली तक्रार
लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha elections) महाविकास आघाडी, महायुती व वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होती. या निवडणुकीत शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकरांचा १ लाखापेक्षा अधिक मतांनी विजय झाला. असे असले तरी निवडणुकीत विधान परिषद सदस्या प्रज्ञा सातव (Pragya Satav)यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत खा. नागेश पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीत नमुद आहे की, आ. प्रज्ञा सातव यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान दोन्ही विरोधी उमेदवारांना मदत केली. काही ठिकाणी त्यांनी महायुतीचे उमेदवार बाबुराव कोहळीकर यांना तर काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. बी. डी. चव्हाण यांना मतदान करण्याचे निरोप आपल्या कार्यकर्त्यांना दिले. शिवाय महाविकास आघाडीतर्फे निवडणुकी दरम्यान घेण्यात आलेल्या प्रचारसभा व नियमित प्रचारातही आ. सातव यांनी सहभाग घेतला नाही. प्रज्ञा सातव यांचे वर्तन काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीच्या धोरणाला छेद देणारे असल्याचे खा. पाटील (Nagesh Patil) यांचे म्हणणे आहे. पक्षाने आ. प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विधान सभेची व्युह रचना ?
खा. नागेश पाटील (Nagesh Patil) यांनी केलेली ही तक्रार म्हणजे येणार्या विधानसभा निवडणुकींसाठीची व्युह रचना असल्याचे राजकीय गोटात बोलले जात आहे. महाविकास आघाडी तर्फे कळमनुरी विधानसभेची जागा मागण्याची तयारी जोरात सुरू आहे. अशात पक्षात एकमेव प्रमुख इच्छुक असलेल्या प्रज्ञा सातवांचीच तक्रार केली तर काँग्रेसला ही जागा मागता येणार नाही, अशी व्युह रचना शिवसेनेतर्फे करण्यात आल्याची चर्चा आहे. निवडणुका होऊन दोन महिने उलटल्यानंतर खासदारांनी केलेल्या या तक्रारीकडे राजकीय डावपेच म्हणुन पाहीले जात आहे.