हिंगोली (Electricity Workers Union) : वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनवृध्दी विषयी आज दि. ४ जुलै २०२४ रोजीची बैठकीतील बोलणी निष्फळ ठरल्याने, येत्या दि.९ जुलै २०२४ रोजीचा एकदिवसीय लाक्षणिक संप हा अटळ आहे. या अनुषंगाने (Electricity Workers Union) वीज अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कृती समितीने उद्या दि. ५ जुलै व दि. ८ जुलै २०२४ हे दोन दिवस महाराष्ट्रातील सर्व परिमंडळ कार्यालये आणि पॉवर सबस्टेशन याठिकाणी व्दारसभेचे आयोजन केले आहे.
याबाबत सबऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशन या (Hingoli Electricity) वीज अभियंत्यांच्या संघटनेचे हिंगोलीचे सहसचिव व्ही. व्ही. शिंदे यांनी विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की, वीज कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी विषयी आमच्या कृती समितीची शासनाशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसमवेत बोलणी झाली आहे. आज दि. ४ जुलै २०२४ रोजी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला यांच्यासमवेत वीज अधिकारी व (Electricity Workers Union) कर्मचारी संघटनांची कृती समिती यांच्यात पगार वाढीच्या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीत महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तीनही वीज कंपन्यांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक हे देखील उपस्थित होते.
या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी विषयी सकारात्मक तोडगा निघाला नसल्याने, (Hingoli Electricity) वीज कर्मचाऱ्यांनी आपले पुर्वघोषित आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. उद्या शुक्रवारी (दि.५) आणि दि. ८ जुलै २०२४ रोजी व्दारसभा घेण्यात येईल तर येत्या दि. ९ जुलै २०२४ रोजी वीज कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप आयोजित करण्यात आला आहे. वीज कर्मचारी संघटनांच्या (Electricity Workers Union) कृती समितीमध्ये महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ,सबाॅर्डीनेट इंजिनीअर्स असोसिएशन,विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन,महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक) आणिमहाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना या पाच संघटनांचा समावेश आहे. दि. ९ जुलैच्या राज्यव्यापी एकदिवसीय लाक्षणिक संपामध्ये सुमारे अडीच लाख वीज कर्मचारी (Electricity Workers Union) सहभागी होण्याची शक्यता आहे.