नगर परिषद व पोलीस विभागाची संयुक्त कामगिरी
हिंगोली (Hingoli Encroachment) : शहरातील प्रमुख मार्गांवर असलेले अतिक्रमण (Hingoli Encroachment) काढण्याची मोहीम सलग दुसर्या दिवशीही सुरू होती. हिंगोली शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यामुळे रस्ते प्रशस्त झाले होते. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मात्र लहान व्यापार्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे वाहतुकीस अनेक अडथळे येत होते.
याबाबत होणार्या सततच्या तक्रारीनंतर प्रशासनाने शहरात (Hingoli Encroachment) अतिक्रमण हटाव मोहीम गुरूवार पासून सुरू केली. शुक्रवारी सुद्धा शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरील व्यावसायिकांची दुकाने काढण्यात आली. या मोहिमेत नगर परिषदेसह पोलीस विभागाचीही महत्वपूर्ण भूमिका होती. या मोहिमेमुळे एकीकडे रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असला तरी छोटे व्यापारी मात्र अडचणीत सापडले आहेत.
लघु व्यावसायिकांना जागा देण्याची मागणी
शहरात किरकोळ व्यापार्यांसाठी कोणतीही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने या व्यापार्यांना (Hingoli Encroachment) अतिक्रमणात दुकाने थाटावी लागतात. पूर्वी शहरातील रामलिला मैदानावर या व्यापार्यांना जागा देण्यात आली होती. हे मैदान प्रशासनाने रिकामे ठेवले आहे. शिवाय शहरात काही ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध असल्याने या जागांवर छोट्या दुकानदारांना रितसर जागा देण्याची मागणी केली जात आहे.