हिंगोली (Hingoli Encroachment) : शहरातील विविध रस्त्यावर अनेक व्यवसायीकांनी अतिक्रमण करून रस्ता व्यापला होता. परंतु न.प.चे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जुलै रोजी विविध भागातील अतिक्रमण (Hingoli Encroachment) न.प. च्या पथकाने हटवून रस्ता मोकळा केला आहे.
हिंगोली नगर पालिकेच्या (Hingoli Encroachment) हद्दीमध्ये अनेक व्यवसायीकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून खोके व इतर साहित्यानी रस्ते अरुंद झाले होते. शहरातील रामलीला मैदाना शेजारी असलेल्या महावीर भवन ते शिवाजीराव देशमुख सभागृह पुढे रामलीला मैदानाच्या पाठीमागील रस्त्यावर न.प.च्या पथकाने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करून हे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आले. त्यामुळे या रस्त्यानी मोकळा श्वास घेतला आहे.
या (Hingoli Encroachment) अतिक्रमण मोहीमेत न.प.चे मुख्याधिरी अरविंद मुंढे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदिप मोदे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, नगर अभियंता प्रदिप नाईक, उपमुख्याधिकारी शाम माळवटकर, साबळे यांच्यासह न.प.चे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




