हिंगोली (Hingoli farmer) : वसमत तालुक्यातील सिरळी येथील अल्पभूधारक (Hingoli farmer) शेतकर्याकडे बैलजोडी नसल्याने त्याने भाऊ व मुलासह कधी नातेवाईकाच्या मुलास औतास जुंपले होते. या संदर्भात दैनिक देशोन्नतीमध्ये सचित्र वृत्त प्रसिद्ध होताच कृषीमंत्री धनंजय मुंढे (Dhananjay Mundhe) यांनी तात्काळ दखल घेऊन शेतकर्याकडे बैलजोडी पाठविली.
वसमत तालुक्यातील सिरळी येथील अल्पभूधारक शेतकरी
अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे यांना बैलजोडी नसल्याने हळद लागवडीसाठी भाऊ, मुलगा व कधी नातेवाईकाच्या मुलास औताला जुंपण्याची वेळ आली होती. याबाबत दैनिक देशोन्नतीमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच तातडीने पुंडगे यांच्यासोबत कृषीमंत्री धनंजय मुंढे (Dhananjay Mundhe) यांनी संवाद साधला. त्यानंतर एक बैलजोडी घेऊन (Nationalist Congress) राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांना सिरळी येथे रवाना केले. तसेच ना. मुंढे यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.राजेंद्र कदम, उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र वाघ, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे यांना २६ जूनला सिरळी येथे रवाना केले. तसेच या (Hingoli farmer) शेतकर्याला कृषी विभागाच्या योजनेंतर्गत लहान ट्रॅक्टरही देण्याची ग्वाही दिली. ना.मुंढे यांच्याकडून बैलजोडी मिळाल्याने पुंडगे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. यावेळी माजी नगरसेवक नाजीम रजवी, सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांचीही उपस्थिती होती.