आखाडा बाळापूरः/हिंगोली (Hingoli farmer suicide) : कळमनुरी तालुक्यातील साळवा येथील वयोवृद्ध शेतकऱ्याने निसर्गाच्या अवकृपेमुळे सततची नापीकी व बंकेच कर्ज कस फेडावे याचिंतेन (farmer suicide) आत्महत्या केली. सदर प्रकरणी बुधवार रोजी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार साळवा येथील शेतकरी व्यंकोजी बापुजी कदम वय 70 वर्षे यांनी सतत शेतात नापिकी होत आसल्यामुळे व बंकेच कर्ज कसे फेडावे या चिंतेन 17 जुलै रोजी सकाळी राहत्या घरी (farmer suicide) किटकनाशक प्राशन केले. सदर प्रकार लक्षात येताच त्यांना उपचारासाठी नांदेड शासकीय रूग्णालयात हलवण्यात आले. परंतु उपचार दरम्यान त्यांचा मुत्यू झाल्याने मदन व्यंकोजी कदम फिर्यादीवरून बुधवार रोजी आकस्मात मृत्यूची नोंद करून, पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गठ्ठे मार्गदर्शनात बिटप्रमुख शेख अन्सार,शिवाजी पवार करत आहेत.