अग्नीशमनदलाच्या पथकाने दिड तासात आग आणली आटोक्यात
हिंगोली(Hingoli):- औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे मंगळवारी ७ मे रोजी रात्रीच्या सुमारास काही दुकानांना अचानक आग(fire) लागून सुमारे ४ दुकाने जळून खाक झाली आहेत. औंढा नागनाथ व वसमत येथील अग्नीशमनदलाच्या (Firefighters)पथकाने दिड तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली तो पर्यंत लाखो रुपयांचे नुकसान (damage)झाले होते. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
जवळाबाजार येथील मुनीर पटेल व्यापारी संकुल येथे किराणा, हार्डवेअर, ॲटोमोबॉईल्स, इलेक्ट्रानिक्स, सलून, ग्राहक सेवा केंद्र, होम डेकोरेशन आदीसह दुचाकी दुरुस्तीची दुकाने आहेत. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दुकानदार दुकाने बंद करून घरी गेले होते. त्यानंतर साडे आठ वाजण्याच्या एका दुकानातून धुर निघत होता. दुकानाला आग (Shop fire) लागल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र रात्री सुरु असलेल्या वादळी वाऱ्यामुळे आग अधिकच भडकत गेली.
दुकाने देखील आगीच्या भक्षस्थानी सापडली
पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. यामध्ये परिसरातील दुकाने देखील आगीच्या भक्षस्थानी सापडली. या आगीची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक प्रसनजीत जाधव, जमादार राजू ठाकूर, सचिन सांगळे, रामा गडदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर औंढा नागनाथ व वसमत पालिकेचे अग्नीशमनदल तातडीने पाचारण करण्यात आले. दोन अग्नीशमनदलाच्या पथकाने दिड तास प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे. रात्री दहा वाजता आग आटोक्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या आगीमध्ये त्र्यंबक चव्हाण यांचे इलेक्ट्रॉनिक, ज्ञानेश्वर चव्हाण यांचे ग्राहक सेवा केंद्र, रामा सोनटक्के यांचे सलून, श्रवण बालकर यांचे कुशन फर्नीचर व होम डेकोरेशन(Home decoration) आदी चार दुकाने जळून खाक झाली असून इतर दुकानांनाही आगीची झळ पोहोचली आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.