हिंगोली(Hingoli):- कळमनुरी तालुक्यातील निमटोक येथे भानामतीच्या आरोपावरून पाच जणांना मारहाण करून जखमी केल्याने २८ ऑक्टोंबरला आखाडा बाळापूर पोलिसात आठ जणांवर गुन्हा(Crime) दाखल करण्यात आला आहे.
काठीने बेदम मारहाण
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील निमटोक येथे एका व्यक्तीने भानामती केल्याच्या आरोपातून किरकोळ वादाची घटना घडली होती. यावरून दोन कुटुंबात कुरबुरी झाल्या. याच कारणातून २७ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास करण हाके, नामदेव हाके, संजय हाके, भारत हाके, गजानन हाके यांच्यासह अन्य तिघांनी शेतामध्ये जाऊन कविता हाके यांच्यासह त्यांचे सासरे, सासू, दीर व मुलास काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत (beating) त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेमुळे गांगारून गेलेल्या कविता हाके यांच्यासह कुटुंबियांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिल्याने आखाडा बाळापूर पोलिसात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मधुकर नागरे हे करीत आहेत.