हिंगोली (Hingoli Flood) : मागील ४८ तासांपासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने हिंगोली तालुक्यांतील अनेक गावांना पुराचा (Hingoli Flood) फटका बसला असून पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याची पाहणी देखील सुधीर अप्पा सराफ यांनी गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत केली.
मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात रुसलेल्या वरूनराजाने हजेरी लावत रात्रीतूनच होत्याचे नव्हते झाले. अनेक शेत शिवारात (Hingoli Flood) पाणीच पाणी झाले. तर काही गावांतील नद्या, नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला होता. काही ठिकाणी पुराच्या पाण्याने पुलाच्या भिंतीची माती कोसळल्याने पुलाला भगदाड पडल्याने पुलावरून पाणी जात होते.
हिंगोली तालुक्यातील अडोळ, खिल्लार, हानकदरी, पिंपरी लिंग, रेपा या गावात पावसाचा फटका बसला असुन शेत शिवारात पाणीच पाणी साचल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली गेली असून मदत कोणाला मागायची अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.
अनेक गावात भिंतीना तडे गेले तर काही गावात पुराचे पाणी (Hingoli Flood) शिरल्याने नुकसान झाले आहे. दरम्यान सोमवारी सुधीर अप्पा सराफ यानी अडोल, खिलार, यांसह अनेक गावांतील पूरग्रस्तांच्या भेटी घेत पाहणी केली, वेळ प्रसंगी पुराच्या पाण्यातून शेतकऱ्या सोबत मार्ग काढत शेतांची पाहणी करून तातडीने सराफ यांनी जिल्हाधिकारी गोयल यांना नुकसान झाल्याची माहिती दिली. यावेळी गोयल यांनी तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांना गावांतील पूरग्रस्तांना भेटी देण्याचे आदेश दिले. त्यांनतर तहसिलदार मांडवगडे, मंडळ अधिकारी इंगोले, तळाठी यांनी येऊन नुकसान ग्रस्त गावांची पाहणी केली. दरम्यान, अडोळ येथील विष्णु खताल यांच्या दोन हेक्टर शेत जमीन पुराच्या पाण्यात खरडून गेल्याने मोठे नुकसान झाले आह. तर खिल्लार येथील ज्योती गजानन शिंदे यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले.
आडुळ येथील पूल गेला वाहून…
आडूळ येथील मुख्य रस्त्यांवरील (Hingoli Flood) पूल पाण्याने वाहुन गेल्याने जावळपास दहा ते १५ गावांचा संपर्क तुटल्याने दळणवळण यंत्रणा ठप्प झाली.
जनावरे वाहून गेली
आडूळ येथील कुंताबाई खिल्लारे यांच्या शेतातील दोन वगारी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले.
वडेट्टीवार यांना व्हिडीओ कॉल द्वारे माहिती
हिंगोली तालुक्यांतील आडूळ, खिल्लार, हुडी, रेपा, आदी गावांना (Hingoli Flood) पुराच्या पाण्याचा फटका बसला असून नदीकाठच्या गावांतील पिकात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचा व्हिडिओ स्वतः सुधीर अप्पा सराफ यांनी विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना दाखवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली.