हिंगोली (Hingoli) :- स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर शताब्दीपूर्ती सोहळा उद्या २५ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्त माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे(Nationalist Congress) जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण यांनी दिली आहे. या शताब्दी सोहळ्याला सर्व नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी केले आहे.
स्वातंत्र्य सेनानी माणिकराव टाकळगव्हाणकर शताब्दीपूर्ती सोहळा
आज २५ फेब्रुवारी मंगळवार रोजी माजी केंद्रीय मंत्री खा. शरदचंद्र पवार (Sharad Chandra Pawar) हे नांदेड येथून ११.३० दरम्यान नर्सी नामदेव येथे जाणार आहेत. त्या ठिकाणी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन विश्वस्तासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी १२ ते ४ या वेळेदरम्यान हिंगोली शहरातील हॉटेल शांतीचे उद्घाटन माजी केंद्रीयमंत्री खा. शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहेत. या वेळी स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांचा शताब्दी गौरव सोहळा त्यांच्या हस्ते पार पडणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी पक्षाचे( शरदचंद्र पवार पक्षाचे) प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, प्रमुख उपस्थिती सार्वजनिक आरोग्य व बांधकाम राज्यमंत्री मेघनाताई (साकोरे) बोर्डीकर, खासदार नागेश पाटील आष्टीकर, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजीमंत्री राजेश टोपे, माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्र्ी माधवराव किन्हाळकर, माजी मंत्री गणेशराव दुधगावकर, माजी मंत्री सुरेशराव वरपुडकर, आ. संतोष बांगर, आ.प्रज्ञाताई सातव, आ.श्वेताताई महाले आ.राजू नवघरे, विधान परिषदेचे सदस्य हेमंत पाटील, आ,सतीश चव्हाण, आ.किरण सरनाईक, आ.विक्रम काळे, माजी खा. सुभाष वानखेडे, माजी खा. शिवाजी माने, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. सुरेश देशमुख, माजी आ.संतोष टारर्फे, माजी आ.गजानन घुगे, माजी आ.विजयराव भांबळे, माजी आ.रामराव वडकुते, माजी आ.मोहनराव हंबर्डे, माजी आ. पंडितराव देशमुख, माजी आ. बळीराम पाटील कोटकर, माजी शिक्षण सभापती रूपाली पाटील गोरेगावकर, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स मुंबईचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील आदींची उपस्थिती राहणार आहेत.
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांचा शताब्दी वर्षपूर्ती गौरव समारंभ व हॉटेल शांतीचा उद्घाटन होणार आहे. हा उद्घाटन सोहळा खा.शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्या निमित्ताने सर्व जय्यत तयारी करण्यात आली आहे.