वयोवृध्द, अपंग, निराधार, विधवा महिला, विद्यार्थी आदींचा मदतीमध्ये समावेश
हिंगोली (Hingoli Ganapati Mandir) : शहरातील गड्डीपीर भागातील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरातर्फे (Ganapati Mandir) ११२ गरजु व्यक्तींना ३ ऑॅगस्ट रोजी प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत वाटप करण्यात आली. सहाय्यक धर्मादाय आयुक्त रविंद्र धायतडक यांच्या संकल्पनेतुन मागील दोन वर्षापासुन गरजु व्यक्तींना श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरा तर्फे आर्थिक मदत वाटप केली जाते. त्यानुसार यावर्षीही ३ ऑगस्टला वयोवृध्द, अपंग, निराधार, विधवा महिला, शैक्षणिक व वैद्यकिय उपचाराकरीता ११२ व्यक्तींना प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सहाय्यक धर्मदाय आयुक्त रविंद्र धायतडक यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर संस्थानचे अध्यक्ष रमाकांत मिस्कीन, सचिव दिलीप बांगर, उपाध्यक्ष सुरेश घन, सदस्य सतिश लोहिया, मनोज दावनगिरे, किशोर मिस्कीन, सल्लागार डॉ. प्रा. विलास डोईफोडे आदींची उपस्थिती होती. सुत्रसंचलन दिलीप बांगर यांनी केले. विशेष म्हणजे मागील दोन वर्षापासुन गरजु व्यक्तींना (Shri Vighnaharta Chintamani Ganapati Mandir) श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिरा तर्फे ही आर्थिक मदत दिली जात आहे.