हिंगोलीत या ठिकाणी उभारलेल्या कृत्रिम जल कुंभात श्री विसर्जन होणार
हिंगोली (Hingoli Ganapati Visarjan) : जिल्ह्यात घरोघरी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन (Ganapati Visarjan) पालिकेने सहा ठिकाणी उभारलेल्या कृत्रिम जलकुंभात (Artificial water tank) केले जाणार असून त्यांची युध्दपातळीवर तयारी सुरू केली आहे. याबाबतची पाहणी हिंगोली शहराचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केली. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अरविंद मुंढे, स्थापत्य अभियंता प्रतिक नाईक, शहर समन्वयक आशिष रनसिंगे, राजकुमार शिंदे, माजी नगरसेवक चंदू लव्हाले ई. उपस्थित होते
जिल्ह्यात गणपती स्थापनेच्या दिवसी घरोघरी गणपती बाप्पाची स्थापना गणेश भक्तांनी केली आहे. विसर्जन करण्यासाठी नागरीकांना अडचण निर्माण होऊ नये. यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही शहरात भक्तांना त्रास होऊ नये, यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे , उपमुखाधिकरी उमेश हेंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तयारी चालविली आहे. त्यानूसार घरोघरी स्थापना केलेल्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी नागरीकांना नदी ठिकाणी जाता येऊ नये. यासाठी आपापल्या परीसरात पालिकेने सहा ठिकाणी कृत्रिम जल कुंभ उभारले आहेत. यात नागरीकांना गणेश मूर्तीचे विसर्जन (Ganapati Visarjan) करता येणार आहे. तर निर्माल्य विसर्जन करण्यासाठी देखील जलकुंभाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगीतले.
दरम्यान, गणेश मूर्ती विसर्जन (Ganapati Visarjan) वेळी भाविकांना अडचणींनीचा सामना रोखण्यासाठी भाविकांना परीसरात कृत्रिम जलकुंभ उभारण्यात आले आहेत. यामधे पालिकेने आदर्श महविद्यालय, शिवाजी नगर येथील दत्त मंदीर, नविन पालिका कार्यालय, अग्नी शमन कार्यालय, एनटीसी परीसर, तिरुपती नगर, अश्या सहा ठिकाणी कृत्रिम जल कुंभाची उभारणी केली आहे. त्यामुळे घरोघरी स्थापना करण्यात आलेल्या गणेश भक्तांना सोयीचे होणार आहे. तसेच शहरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणपती साठी कयाधू नदी अन् शिरेहक शाहा बाबा दर्गा तलावात (Hingoli Ganapati Visarjan) गणेश मुर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. गणेश मंडळाना अडचण निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेच्या वतीने युद्धपातळीवर रस्त्याची दुरुस्ती केली जात आहे.