हिंगोली (Hingoli Garden ) : शहरातील नारायण नगर भागात २५ लाख रुपये खर्चातून उद्यानाचे सौंदर्यीकरण सुरू आहे. यामध्ये प्रवेशव्दारासह इतर कामे केली जात आहेत. नगर पालिकेकडे हे उद्यान हस्तांतरीत करण्यापूर्वीच त्याचे प्रवेशव्दार लटकल्याने सुरू असलेल्या कामाबद्दल नागरीकांतून शंका कुशंका घेतल्या जात आहेत.
हिंगोली शहरामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी प्राप्त झाल्यामुळे अनेक ठिकाणी विकासाची कामे केली जात आहेत. या विकास कामामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जात असताना नारायण नगर भागामध्ये २५ लाख रुपये खर्चातून होणार्या सौंदर्यीकरणाच्या कामामध्ये (Hingoli Garden) उद्यानाला लावलेली प्रवेशव्दार आजच्या परिस्थितीमध्ये लटकले आहे. सद्या काम पूर्ण झाले नसुन आतापर्यंत झालेल्या कामाबाबत शंका कुशंका घेतल्या जात आहेत.
निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी
हिंगोली शहरातील नारायण नगर भागामधील ओपन स्पेसमध्ये २५ लाख रुपये खर्चातून (Hingoli Garden) उद्यानाचे सौंदर्यीकरण केले जात आहे. एक महिन्यापासून हे काम सुरू आहे. यामध्ये संरक्षण भिंती, पेव्हर ब्लॉक आदी कामे हाती घेण्यात आली आहेत. काही प्रमाणात कामे झाली आहेत. परंतु झालेल्या कामापैकी उद्यानाचे प्रवेशव्दारच लटकले आहे. विशेष म्हणजे या उद्यानाचे नगर पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आले नाही. हस्तांतरीत करण्या पूर्वीच अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना पहावयास आल्याने नारायण नगर भागातील नागरीक संतप्त झाले आहेत. त्यामुळे या होणार्या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.