हिंगोली(Hingoli) :- उत्तर प्रदेशातील प्रयागराज(Prayagraj) येथे १२ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीमध्ये महाकुंभ मेळाव्याचे (Maha Kumbh Mela) आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभमेळाव्याला हिंगोली मार्गे पाच विशेष रेल्वे धावणार आहेत.
महाकुंभमेळाव्याला हिंगोली मार्गे पाच विशेष रेल्वे धावणार
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १२ जानेवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत महा कुंभ मेळावा असून यानिमित्त भाविकांच्या सोवीसाठी दक्षिण मध्य रेल्वेतर्फे ७ ते २७ फेब्रुवारी दरम्यान हिंगोली, वाशिम, अकोला, खंडवा जबलपूर, महेर, प्रयागराज आदी मार्गे पटनापर्यंत पाच फेरी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी पाच फेरी धावतील यामध्ये रेल्वे क्रमांक ०७१०१, रेल्वे क्रमांक ०७ १०२ औरंगाबाद पटना औरंगाबादचे चार फेरी असून रेल्वे क्रमांक ०७०११, रेल्वे क्रमांक ०७१०० नांदेड पटना अशी असून नांदेडचे दोन फेरी रेल्वे करणार असून रेल्वे क्रमांक ०७१०५, तसेच रेल्वे क्रमांक ०७ १०६ सिकंदराबाद पटना सिकंदराबाद या विभागातून दोन फेऱ्या होणार आहेत. यामध्ये रेलवे क्रमांक ०७ १०३, रेल्वे क्रमांक ०७ १०४ काचीगुडा पटना काचीगुडा स्पेशल रेल्वेची दोन फेरी होणार आहेत अशी माहिती स्टेशन मास्टर पप्पू कुमार यांनी दिली. जबलपूर, महर, प्रयागराज, वाराणसी, बुद्धगया आदी ठिकाणी येण्या जाण्यासाठी प्रवाशांची सोय होणार आहे.
याबद्दल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष धरमचंद बहेरा, जेठानंद नेनवाणी, गणेश साहू, डॉ. विजय निलावार, प्रवीण पडघन यांनी महा कुंभ स्पेशल रेल्वेच्या आयोजनासाठी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव व दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन यांचे आभार मानले. तसेच प्रयागराज येथे होत असलेल्या या महाकुंभ मेळाव्याला सोडलेल्या रेल्वे गाठ्यांचा कुभ मेळाव्याला जाण्यासाठी प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.