हिंगोली (Hingoli Heavy Rain) : जिल्ह्यात ३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान सर्वत्र मुसळधार पावसाने थैमान घातल्याने हाहाकार उडाला. अनेक ठिकाणी नागरीक पुराच्या पाण्यात अनेकजण अडकले असता आपत्ती व्यवस्थापन कक्षासह खुद्द आ.संतोष बांगर यांनी देखील बचाव कार्य केले. त्यात ५४ जणांना वाचविण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यामधील हा (Hingoli Heavy Rain) सर्वाधिक मोठा पाऊस झाला. सर्वच्या सर्व मंडळात अतिवृष्टी झाली. ज्यामध्ये हिंगोली २२५, नर्सी नामदेव १५३, सिरसम १४९, बासंबा २२५, डिग्रस कर्हाळे १८६, माळहिवरा १४९, खांबाळा १५९ असा हिंगोली तालुक्यात १७८.३, कळमनुरी १५२, वाकोडी १५४.५, नांदापूर १६४, आखाडा बाळापूर १०६.५, डोंगरकडा ११२.३, वारंगा ११२.३ असा कळमनुरी तालुक्यात १३३.६, वसमत ११५.५, आंबा १३९.३, हयातनगर ८५.८, गिरगाव १५८.५, हट्टा ११०.३, टेंभुर्णी १०३.३, कुरूंदा १११.५ असा वसमत तालुक्यात ११७.७, औंढा नागनाथ १४२.८, येहळेगाव सोळंके १८६.९, साळणा १४५.३, जवळा बाजार ११९ असा औंढा नागनाथ तालुक्यात १४८.५, सेनगाव १२४.३, आजेगाव ८०.३, साखरा १३३.८, पानकनेरगाव १३४.५, हता १६९.८ असा सेनगाव तालुक्यात १२८.५ तर जिल्हाभरात १४१.७ मि.मी.पाऊस झाला आहे.
या (Hingoli Heavy Rain) मुसळधार पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आला. सोमवारी सुद्धा पावसाचा जोर कायम होता. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, हिंगोली न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्यासह अधिकार्यांनी ४८ तासापासून मदत व बचाव कार्य सुरू ठेवले. याकरीता विविध पथके स्थापन करून रेसक्यू ऑपरेशन राबविण्यात आले. त्यात ५४ जणांना रेसक्यू पथकासोबत आमदार संतोष बांगर यांनी सुखरूप बाहेर काढले. सोमवारी देखील अधुनमधून पाऊस कोसळत होता तर हिंगोली जिल्ह्यात गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटात वेगाने पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविल्याने सर्वत्र यंत्रणेला हाय अलर्ट ठेवण्यात आले आहे. या पुरामध्ये सर्वाधिक कळमनुरी तालुक्यातून अनेकांना बाहेर काढले. आ.संतोष बांगर यांच्यासह बचाव कार्य पथकाने अनेकांना सुखरूप बाहेर काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
अडकलेल्या कुटुंबाला आ. बांगर यांनी स्वत बोटीतून जाउन सुरक्षित हलवले
कळमनुरी तालुक्यातील विविध भागात दोन दिवसापासून सुरु आसलेल्या मुसळधार पावसाने कयाधु नदीबरोबर नदीलाल्यांना पुर आले आहे.कयाधु नदीला मोठा पुर आला आसता नदीपलीकडे शिवअप्पा खंदारे यांच्या आखाड्यावर पाचजण अडकले होते सदर बाब उपसरपंच गजानन देशमुख यांनी आ.संतोष बांगर यांना सांगितली आसता आज सकाळी आ.संतोष बांगर स्वतः बोट व रेक्यु टीमसोबत आले त्यांनी बोटीतून घटनास्थळी पोहचत सदर नागरिकांना धीर देत सुरक्षित स्थळी हलवले. शेतातील आखाड्यावर अडकून पडलेल्या पाच जणासोबत एक आठ दिवसाच नवजात बाळही होते सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
शेती पिकाला फटका
या (Hingoli Heavy Rain) अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, ज्वारी, उडदी, मुग आदी पीक पाण्याखाली गेले असून काही ठिकाणी हदळीचे पीकही खरडून गेले आहे. विशेष म्हणजे मुग, उडीद काढणीला आलेला असताना त्यालाही मोठा फटका बसला आहे.
यंत्रणा अर्लट
सोमवारीही पाऊस होता आणखी पावसाची शक्यता (Hingoli Heavy Rain) असल्याने सर्वत्र यंत्रणा अर्लट ठेवण्यात आली आहे.