आखाडा बाळापूर/हिंगोली (Hingoli Heavy rain) : मागील काही दिवसापासून हिंगोली जिल्ह्यासह सर्वत्र पावसाने (Heavy rain) सतत धार लावली असून कळमनुरी व परिसरातही सतत दारू सुरू आहे. यामुळे अनेक ओढ्या नाल्यांना पूर आला असून आखाडा बाळापुर ते हदगाव मार्गावर असलेल्या मार्लेगाव बोरगाव येथील रस्त्यावरील पांडवा ओढ्याला २६ जुलै शुक्रवार रोजी पूर आला होता.
या दरम्यान कळमनुरी तालुक्यातील कवडी येथील गजानन बनसोडे नावाचा युवक पुराच्या पाण्यातून (Heavy rain) जात असताना ग्रामस्थांनी रोखले; परंतु सदरील युवक पुराच्या पाण्यातून जात असताना पाण्याचा दाब वाढला त्यामुळे युवकाची दुचाकी पडली यात युवक बाल बाल बचावला; परंतु त्या युवकाची दुचाकी वाहून गेली होती. त्यानंतर पूर ओसरल्यानंतर २७ जुलै शनिवार रोजी दुचाकी मिळून आली असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सदरील युवकास बोरगाव येथील ग्रामस्थांनी ही माहिती देऊन त्या युवकास दुचाकी परत केली आहे .