औंढा नागनाथ/ हिंगोली (Hingoli heavy rain) : औंढा नागनाथ तालुक्यातील रामेश्वर या भागामध्ये दुपारी चारच्या दरम्यान (heavy rain) ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने ओढा नाल्यांना पूर आला तर औंढा जिंतूर जाणाऱ्या रोडवर रामेश्वर या गावात पुलाचे काम चालू आहे .ओढ्यानाल्यांना पूर आल्याने काम थांबले असून औंढा जिंतूर रोड काही काळ या पुराच्या पाण्यामुळे बंद झाला असून ओढ्याच्या पुराचे पाणी ओसरल्यानंतर परत औंढा-जिंतुर रोड सुरू झाला.
औंढा नागनाथ-जिंतुर रोड काही वेळ बंद
रोडचे काम करणाऱ्या कंपनीला सुद्धा (heavy rain) पावसाच्या ओढ्याच्या पुराच्या पाण्यामुळे पुलाच्या खोदकामांमध्ये पाणी साचत आहे. तसेच साईडला टाकलेला मुरूम देखील पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेला व तसेच गजाळी व सेंट्रींग व इतर साहित्य देखील या पुरामध्ये वाहून जात असून काम करणाऱ्य कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.