हिंगोली (Hingoli Heavy rain) : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकासह अनेक घराघरात मोठे नुकसान झाले. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumathankar) यांनी केली आहे.
विधानसभा क्षेत्रासह जिल्हाभरात १ सप्टेंबरला वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे नदी, नाले, ओढ्यांना महापूर (Hingoli Heavy rain) आला. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तुर, हळद, कापूस शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरी व ग्रामीण भागात अनेक लोकांच्या घरात शिरल्याने त्यांची घरे पडली असून संसार उघड्यावर आला आहे.
काहींच्या दुकानात व घरात पाणी शिरल्याने अनेक मोल्यवान वस्तू खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी जनावरे वाहून गेले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. काही गावांचा संपर्क तुटला आहे. या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी ही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यकडे भाजपा नेते रामदास पाटील सुमठाणकर (Ramdas Patil Sumathankar) यांनी केली आहे.