देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli : हिंगोलीचा पुष्यमित्र जोशी ब्रिक्समध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Hingoli : हिंगोलीचा पुष्यमित्र जोशी ब्रिक्समध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

admin1
Last updated: 2025/05/08 at 4:01 PM
By admin1 Published May 8, 2025
Share

हिंगोली (Hingoli) :- नुकताच भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त झालेला, हिंगोलीचा संशोधक, पुष्यमित्र जोशीची ब्रिक्स (BRICS) संघटनेमध्ये भारत सरकारकडून युवा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. भारत सरकारच्या ब्रिक्सच्या पुढील बैठकांमध्ये पुष्यमित्र (Pushyamitra) भारताचे प्रतिनिधित्व जागतिक स्तरावर करणार आहे.

सारांश
ब्रिक्स संघटनेत भारत सरकारच्या प्रतिनिधीपदी सलग दुसऱ्यांदा निवडडिस्पोजमित्र उपकरणाचा वापर करून मास्कची सुरक्षित लावली विल्हेवाट

ब्रिक्स संघटनेत भारत सरकारच्या प्रतिनिधीपदी सलग दुसऱ्यांदा निवड

याआधी मागील वर्षी देखील ब्रिक्सच्या सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन वर्किंग ग्रुपमध्ये पुष्यमित्रने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. ब्रिक्स ही भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांनी मिळून तयार झालेली शिखर संघटना आहे. आता त्यामध्ये इजिप्त, इथियोपिया, इराण, सौदी अरेबिया व युनायटेड अरब अमीरात या देशांचाही समावेश झाला आहे. जगाच्या लोकसंख्येचा ४५% भाग व अर्थव्यवस्थेचा २८% भाग ब्रिक्स देश व्यापतात. एवढा मोठा विस्तार असणाऱ्या संघटनेत पुष्यमित्र जोशी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. नुकताच भारताच्या संसदेत देशाचा सर्वोच्च युवा पुरस्कार असलेला राष्ट्रीय युवा पुरस्काराने पुष्यमित्रला गौरविण्यात आले. पुष्यमित्र जोशी हा एक संशोधक, नवोपक्रमकर्ता, लेखक आणि धोरण सल्लागार म्हणून सुपरिचित आहेत. त्याच्या कार्यामुळे समाजपरिवर्तनासाठी उपयुक्त असलेले संशोधन घडवले आहे. त्याच्या तीन संशोधनांना भारत सरकारकडून पेटंट मान्यता मिळाली आहे.

डिस्पोजमित्र उपकरणाचा वापर करून मास्कची सुरक्षित लावली विल्हेवाट

कोविड-१९ च्या काळात, त्याने डिस्पोजमित्र (DisposalMitra) उपकरणाचा वापर करून मास्कची सुरक्षित विल्हेवाट लावली आणि सॅनिटायझरची बाजारात कमतरता असताना त्याने स्वतःच सॅनिटायझर तयार करून गरजू लोकांना विनामूल्य वितरित केले होते. त्याचबरोबर, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी इम्युनो बूस्टर तयार करून हजारो लोकांना मोफत वितरित केले.  भारताच्या २३० हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण जास्त असल्यामुळे १० पेक्षा अधिक गंभीर आजार होतात. या समस्येवर उपाय म्हणून, पुष्यमित्र जोशीने ‘अ‍ॅक्वामित्र’ हे पेटंटप्राप्त संशोधन विकसित केले आहे. हे संशोधन अतिशय कमी खर्चात आणि कोणत्याही उर्जेशिवाय पाण्यातील फ्लुराईड कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे दुर्गम भागातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. पुष्यमित्र जोशीनी विज्ञान, पर्यावरण आणि जीवनशास्त्र यावर तीन शैक्षणिक पुस्तके लिहिली आहेत, जी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्याचे २० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर विविध जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्याचे ऐतिहासिक आणि राजकीय विषयांवर लेख देखील प्रसिद्ध आहेत. जी२० जागृती यात्रेत ‘बिझ ज्ञान ट्री’ स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय युवा महोत्सवात केले आणि विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. त्याला महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून ‘अविष्कार’ संशोधन फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे.

You Might Also Like

Mass Leave Agitation: सामूहिक रजा आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद

Agriculture Department Sting Operation: शेतकऱ्यांनीच केले खत विक्रेत्यांचे स्टिंग ऑपरेशन कृषी विभागाच्या पथकाने नऊ दुकानांची केली तपासणी

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

Hingoli Jijau Brigade: फुलेवाड्याचे खाजगीकरण थांबवण्यात यावे…

TAGGED: BRICS, DisposalMitra, Hingoli, Pushyamitra
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भबुलडाणाराजकारण

Buldana: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राहुल बोंद्रे यांचे अन्यत्याग आंदोलनाला सुरू

admin1 admin1 September 23, 2024
Parbhani Case: त्या राजवाडी पुलावरुन वाहून गेलेल्या दोघा दुचाकीस्वारांचे मृतदेह सापडले!
NCP Morcha: परभणीत बोगस कामांवर कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) चा तहसील कार्यालयावर मोर्चा
Prakash Pohare: रस्त्यावरच्या आंदोलनानंतर आज जिल्हा प्रशासनासोबत मॅरेथॉन बैठक; वाद अन् संवादही…
Election Police Mock Drill: पोलिसांचे मॉकड्रिल, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने नागरीकांच्या डोळ्यात पाणीच पाणी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Mass Leave Agitation
मराठवाडाहिंगोली

Mass Leave Agitation: सामूहिक रजा आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळा बंद

December 5, 2025
Agriculture Department Sting Operation
मराठवाडाशेतीहिंगोली

Agriculture Department Sting Operation: शेतकऱ्यांनीच केले खत विक्रेत्यांचे स्टिंग ऑपरेशन कृषी विभागाच्या पथकाने नऊ दुकानांची केली तपासणी

December 5, 2025
Saur Krushi Pump Yojana
मराठवाडाछत्रपती संभाजीनगरब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशेती

Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम, गिनीज बुकात नोंद

December 5, 2025
Nanded Police
मराठवाडाक्राईम जगतनांदेड

Nanded Police: कुबड्यासह अन्य एकाची नांदेड पोलिसांनी केली कारागृहात रवानगी

December 5, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?