हिंगोली (Hingoli Hollyball tournament) : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती व जिल्हा हॉलीबॉल असोसिएशन च्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि.१७ फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनीताताई मुळे व हॉलीबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख अभय सावंत उर्फ गोपू पाटील, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रांगणा दिनांक १७ फेब्रुवारी मंगळवार रोजी सायंकाळी (Hingoli Hollyball tournament) व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते बॉल फेकून करण्यात आले याप्रसंगी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या उपाध्यक्ष विद्याताई पवार,अर्चनाताई जाधव,उषातई इंगोले, कोषाध्यक्ष कांताताई कल्याणकर, कार्याध्यक्ष स्वातीताई भोयर, ऍड.उल्हास पाटील, मा.जि प उपाध्यक्ष मनीष आखरे,ऍड. अमोल जाधव,सोनू डांगे, डॉ.सतीश शिंदे,प्रकाश इंगोले, नामदेव पवार यांच्यासह आयोजक जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे नगरसेवक उमेश गुट्टे, मनोहर मगर, जितेंद्र भट्ट ,जगताप सर ,सुशील इंगोले, सलीम मिर्झा, मानव चितेवार, राहुल मगर, आदर्श जयस्वाल, पृथ्वी जयस्वाल, रितेश वाघमारे, योगेश घुगे, शिवम पोते, काळबांडे सर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व फुटबॉल खेळाडू ग्राउंडवर उपस्थित होते.




