हिंगोली (Hingoli Home Minister) : येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत जिजाऊंच्या लेकींनी आपल्या बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर मानाच्या पैठणी साड्यांवर आपले नाव कोरले. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या स्पर्धेत हिंगोली शहर व जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून शिवजयंती उत्सवाचा आनंद द्विगुणित केला.
हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने (Hingoli Home Minister) होम मिनिस्टर स्पर्धेत मानाची पैठणी व विविध भेटवस्तू जिंकण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेचे सुंदर संचलन अकोला येथील टीव्ही स्टार अजिंक्य देशमुख यांनी केले तर उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष रेखाताई श्रीराम बांगर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सुषमाताई राम कदम राजमती शिवाजी मुटकुळे ह्या होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सुनिताताई मुळे ह्या होत्या. या स्पर्धेत ३ पैठण्या साड्या व विविध वस्तूंचे विजेत्यांना वाटप करण्यात आले.
हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने दि.१७ फेब्रुवारी सोमवार रोजी शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात सायंकाळी होम मिनिस्टर स्पर्धेत मानाची पैठणी व विविध भेटवस्तू जिंकण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत हिंगोली शहरातील व जिल्ह्यातील जिजाऊच्या लेकीने मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.
तब्बल तीन तास चाललेल्या या स्पर्धेत महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध खेळ, नृत्य स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. ‘बुद्धी, बल आणि सामर्थ्य’ यांचा कस लागणाऱ्या या स्पर्धेत महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. केवळ खेळच नव्हे, तर जिजाऊंच्या लेकींचे शौर्य आणि चातुर्यही या निमित्ताने पाहायला मिळाले.
स्पर्धेच्या शेवटी मानाच्या तीन पैठणी साड्यांचे वितरण करण्यात आले. ज्यामध्येप्रथम क्रमांक विनया सचिन बासटवार (मानाची पैठणी) द्वितीय क्रमांक शांताबाई जगन वाबळे, तर तृतीय क्रमांक माया दयानंद काळे ह्या मानकरी ठरल्या, याशिवाय अन्य विविध बक्षिसाचे वितरण या वेळी करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या सचिव रजनी पाटील, उपाध्यक्ष विद्याताई पवार, उषाताई इंगोले, अर्चना जाधव,साधना हेंबाडे, अरुणाताई अंभोरे, सुनीता सूर्यतळ, कोषाध्यक्ष कांता कल्याणकर यांच्यासह जयंती मंडळाच्या सीमा वडतकर, अलका लोखंडे, सीमाताई भिसे,विद्या पतंगे, सुवर्णा बोरकर, जया पवार, नीता सावके, शारदा दोडके, छाया मगर, बलवंत कौर, जया सावके, मंजुषा बासटवार, ज्योती शेळके, प्राजक्ता पाटील, वसुंधरा सवनेकर, राधिका देशमुख, वृषाली पाटील, साधना घ्यार, शिल्पा भालेराव, सुजाता जोजार,वंदना सरनाईक आदींसह मोठ्या संख्येने मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रायोजक डाॅ.स्वाती पवार, डॉ.वैशाली सावळे, डॉ.वर्षा पवार, डॉ.सोनाली कदम ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मंडळाचे अध्यक्ष सुनीताताई मुळे यांनी केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी खंडेराव सरनाईक डॉ.रमेश शिंदे, मनीष आखरे, प्रकाश इंगोले यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या महिला पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले स्पर्धेत मोठ्या संख्येने शहरातील व परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या.




