हिंगोली (Hingoli Hospital) : येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (Hingoli Hospital) ९ डिसेंबर २०२१ रोजी डॉ. फैजल हे कर्तव्य बजावत असताना पेन्शनपुरा भागातील एका आरोपीने माझ्यावर येथेच इलाज करा अशी धमकी देवुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल झाला होता. या (Hingoli Police) प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधिश पि.जी. देशमुख यांनी आरोपीला सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा व दहा हजारांचा दंड सुनावला.
माहितीनुसार, हिंगोलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात (Hingoli Hospital) डॉ. फैजल सलीम पठाण हे ९ डिसेंबर २०२१ रोजी कर्तव्य बजावत असताना पेन्शनुपरा भागातील सय्यद सलाऊद्दीन हाश्मी हे रुग्णालयात आले होते. त्याने माझ्यावर येथेच उपचार करा, औरंगाबाद जाण्यासाठी का सांगत आहात असे म्हणून जोरजोराने ओरडुन टेबल आदळुन डॉ. पैâसल यांच्या हातातील ओपीडी रजिस्टर फेकुन देवुन तु माझ्यावर येथेच इलाज कर नाही तर तु येथे नौकरी कशी करतोस ते मी पाहुन घेतो अशी धमकी देवुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने सय्यद सलाऊद्दीन हाश्मी याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास (Hingoli Police) पोलीस उपनिरीक्षक माधव जिवारे यांनी केला.
हे प्रकरण येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.जी.देशुमख यांच्यासमोर सुरू होते. २ जुलै रोजी जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.जी. देशमुख यांनी आरोपी सय्यद सलाऊद्दीन हाश्मी याला गुन्ह्यात दोषी ठरवुन सहा महिने कारावासाची शिक्षा व दहा हजाराचा दंड, दंड न भरल्यास प्रत्येक दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील एस.डी.कुटे यांनी बाजु मांडली तर त्यांना अॅड. एन.एस. मुटकुळे, अॅड. सविता एस.देशमुख यांनी सहकार्य केले. या (Hingoli Hospital) तपास कार्यात (Hingoli Police) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक फेरोज शेख यांनी सहकार्य केले.