हिंगोली (Hingoli Hospital) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी (Government Medical Colleges) बळसोंड भागातील खासगी इमारत भाडेतत्वावर घेण्याकरीता मान्यता दिली असून चालू शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचे संकेत मिळाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या.
हिंगोलीत नोव्हेंबर महिन्यात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे (Medical Colleges) वैद्यकीय महाविद्यालयास शासनाने मान्यता दिली होती. या ठिकाणी डॉ.चक्रधर डॉ.मुंगल यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्ती केल्यापासून महाविद्यालयाच्या कामांना वेग आला आहे. वैद्यकीय महाविद्यायाकरीता लागणार्या प्राध्यापक आणि वर्ग ३, वर्ग ४ च्या कर्मचार्यांची बहुतांश पदे भरण्यात आली आहेत. डॉ.मुंगल यांनी इमारतीसाठी जागा संपादित करून घेतली असून शासकीय रूग्णालयात पात्र वैद्यकीय अधिकार्यांना प्राध्यापक म्हणून नियुक्ती दिली आहे. दोन दिवसापूर्वी दिल्लीच्या नॅशनल मेडिकल कॉन्सिलच्या पथकाने हिंगोलीत आल्यानंतर इमारतीमधील भौतिक सुविधांसह इतर अनेक बाबींची पाहणी केली.
यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयासाठी (Medical Colleges) भरण्यात आलेली पदे व रिक्त पदांची माहिती घेऊन प्रत्यक्ष कागदपत्रही पाहिले. खासगी इमारत भाडेत्वावर घेऊन त्यामध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून घेतल्या.वैद्यकीय शिक्षण विभागाने बळसोंड भागातील ६४९९ चौरस मिटर जागेत असलेल्या इमारतीला मंजुरीही दिली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वत:ची इमारत उभी व्हायला किमान दोन-तीन वर्ष लागणार आहेत. तो पर्यंत महाविद्यालय चालविण्यास अडचण येऊ नये म्हणून भाडेतत्वावर जागा घेण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी जवळपास १.२५ कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून (Hingoli Hospital) वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत.