डायलेसिस विभागातील आदर्श रुग्ण, किडनी दानशूर, अधिकारी व कर्मचारी यांचा स्वातंत्र्य दिनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव
हिंगोली (Hingoli Hospital) : हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात दि. २ जानेवारी, २०१४ रोजी डायलेसिस विभाग कार्यान्वित झाले आहे. या विभागात एकूण चार डायलेसिस मशीन कार्यान्वित आहेत. मागील १० वर्षात ३१ जुलै २०२४ पर्यंत एकूण १९ हजार १३ रुग्णांवर डायलेसिस उपचार करण्यात आले. या (Hingoli Hospital) विभागात आदर्श रुग्ण विजय विश्वनाथ गिते वय ३१ वर्ष रा. अंजनवाडी ता. औंढा येथील असून हा रुग्ण जिल्हा रुग्णालय येथे जून २०१५ पासून आजपावेतो मागील वर्षभरापासून नियमित डायलेसिस उपचार घेत आहेत. तसेच एक किडनी प्रत्यारोपण रुग्ण बालाजी सटवाराव मस्के वय ३७ वर्ष रा. हनकदरी ता.सेनगाव येथील रुग्णांचे ऑगस्ट २०२१ ला जिल्हा रुग्णालय येथे डायलेसिस उपचार सुरु झाले. या रुग्णाच्या पत्नीस व रुग्णाला डायलेसिस विभागातर्फे किडनी प्रत्यारोपण करण्याबाबत सल्ला देऊन रुग्णाच्या पत्नी श्रीमती सोनाली मस्के यांना किडनी दान करण्यासाठी प्रवृत्त केले. या रुग्णाचे के.ई.एम. शासकीय रुग्णालय मुंबई येथे गतवर्षी यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाले. सध्या पती व पत्नी निरोगी जीवन जगत आहेत.
जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस विभागात दिल्या जाणार्या (Hingoli Hospital) शासकीय सेवा सुबिधा व उपचाराबाबत लोकांमध्ये, जनतेमध्ये, किडनी आजाराबाबत व किडनी प्रत्यारोपण बाबत, किडनी अवयव दानाबाबत व डायलेसिस उपचाराबाबत जनमानसात जनजागृती व्हावी व माहिती व्हावी तसेच रुग्णालयाची प्रतिमा उंचावण्यासाठी व रुग्णांचे मनोवल वाढवण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श रुग्ण, आदर्श किडनी दानशूर यांचा सत्कार तसेच डायलेसिस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा मागील १० वर्षात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते आदर्श रुग्ण विजय विश्वनाथ गीते, आदर्श किडनी दानशूर श्रीमती सोनाली बालाजी मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, किडनी विकार तज्ञ डॉ. संतोष दुरुगकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. तुकाराम आउलवार, इन्चार्ज सिस्टर श्रीमती बिना जॉर्ज, डायलेसिस सायंटिफिक ऑफिसर एजाजखान पठाण, अरविंद कदम, संतोष गिरी, स्टाफ नर्स श्रीमती जिजा रुंजे, श्रीमती प्रिती काकडे, कक्षसेवक कैलास गवळी, सफाई कामगार देविदास वाव्हळ यांचा स्वातंत्र्य दिनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
डायलेसिस विभागात उपलब्ध सुविधा
डायलेसिस विभाग (Hingoli Hospital) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीमध्ये चालते. डायलेसिस विभाग जिल्हा रुग्णालय येथे सर्व शासकीय सेवा सुविधा मोफत दिल्या जातात. डायलेसिस विभागातील अधिकारी व कर्मचारी हे अनुभवी व प्रशिक्षित असून सर्व सेवाभावाने कामे करतात व तत्पर आरोग्य सेवा देतात. सर्व डायलेसीस रुग्णांना मोफत तपासणी, रक्त चाचण्या, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, ई.सी. जी. रक्त पुरवठा, आय.सी.यु, व लसीकरण केले जाते. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत दुर्धर आजाराच्या प्रत्येक रुग्णाला १० हजार रुपये एक वेळ शासकीय अनुदान, संजय गांधी निराधार योजना लाभ, एस.टी. बस. मोफत प्रवास, आयुष्यमान भारत योजना, महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री नँशनल डायलेसीस प्रोग्राम योजना इत्यादी योजनेअंतर्गत रुग्णांना सर्व सेवा सुविधा दिल्या जातात. आतापर्यंत डायलेसीस रुग्णांच्या उपचाराचे अंदाजे ६ ते ७ कोटी रुपये शासनाकडून वाचविण्यात आले. सर्व रुग्णांना चहा, नाश्ता, जेवण, शुद्ध पिण्याचे पाणी, वातानुकुलीत सुसज्ज डायलेसिस सेवा दिल्या जातात.