हिंगोली(Hingoli):- मनोज जरांगे यांनी परभणी येथील सभेमध्ये राजकीय हेतू साध्य करण्याच्या उद्देशाने मंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याने हिंगोली शहर पोलिसात मनोज जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.
मनोज जरांगे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा
याबाबत पुढील सूत्राने दिलेली माहिती अशी की, 4 जानेवारी रोजी परभणी येथे जाहीर सभेमध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सामाजिक तेढ निर्माण करून केवळ राजकीय हेतू साध्य करण्याच्या उद्देशाने मंत्री धनंजय मुंडे यांचा मृतक संतोष देशमुख यांच्या हत्या (Murder)प्रकरणाशी अर्थी संबंध नसताना त्यांच्याविषयी समाजात तिढा निर्माण करून धनंजय मुंडे यांना रस्त्यावर फिरू देणार नाही व त्यांना घरात घुसून मारायचे असे भडकाऊ विधान केले. यासंदर्भात युट्युब व रक्तवाहिन्यांच्या वेगवेगळ्या व्हिडिओवर प्रसारित सुद्धा झाले. त्यामुळे ७ जानेवारीला हिंगोली शहर पोलिसात महेश गणपत बांगर यांनी दिलेल्या फिर्यादी मनोज जरांगे राहणार अंतरवाली सराटी जिल्हा जालना यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक परगेवार हे करीत आहेत.