हिंगोली(Hingoli):- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ करावी यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य (Maharashtra State)अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या माध्यमातून अनेक वेळा आंदोलन करून शासन दरबारी न्याय व हक्क मिळविण्यासाठ निवेदन देण्यात आले.
मदतनिसांच्या मानधनात वाढ करून प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा निर्णय
शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन अंगणवाडी सेविका, मदतनिसांच्या मानधनात वाढ करून प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात ४ ऑक्टोंबरला शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. १ ऑक्टोंबर २०२४ पासून राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस (Helper) यांच्या प्रतिमहा मानधनात वाढ करण्याचा तसेच त्यांना प्रतिमहा प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ज्यामध्ये अंगणवाडी सेविकेला केंद्राचा सात टक्के हिस्सा २७०० रूपये, राज्य हिस्सा ४० टक्के १८०० रूपये, अतिरीक्त राज्य हिस्सा शंभर टक्के ५५०० रूपये असे सुधारीत प्रतिमहा मानधन १३ हजार रूपये, अंगणवाडी मदतनिसांना केंद्र हिस्सा ७ टक्के प्रमाणे १३०० रूपये, राज्य हिस्सा ४० टक्के प्रमाणे ९०० रूपये, अतिरीक्त राज्यहिस्सा शंभर टक्के प्रमाणे ३२५० रूपये एकूण ५५०० तर आता सुधारी प्रतिमहा मानधन ७ हजार ५०० रूपये व ५ टक्के वाढ दिली जाणार आहे.
अंगणवाडी कर्मचार्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ
सेवा ज्येष्ठतेनुसार वरील प्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात आली आहे. सदर मानधन वाढ अंगणवाडी कर्मचार्यांच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्याच्या अधिन राहून करण्यात आली आहे. या वाढीव कालावधीत गरोदर महिला(Pregnant women), स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या, कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा, आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन, समुपदेशन आदी विविध सेवा, उपक्रम राबविण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अंगणवाडी सेविकांना प्रतिमहा १६०० ते २ हजार पर्यंत तर मदतनीसांना ८०० ते १ हजार रूपया पर्यंत प्रोत्साहन भत्ता काही निकषाच्या आधारे अनुज्ञेय करण्यात आला आहे.
लढ्याला आले यश-भगवानराव देशमुख अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या माधनासह इतर प्रश्नासाठी जिल्हा स्तरापासून शासन स्तरावर अनेक वेळा आंदोलन केल्याने ही मानधन वाढ झाली. त्यामुळे म.रा.अंगणवाडी सेविका, मदतनीस महासंघातर्फे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी महायुती शासनाचे आभार मानले.