हिंगोली (Hingoli Jaleshwar lake) : शहरातील जलेश्वर तलावाचे सौंदर्यीकरण केले जात आहे. यंदाचा पावसाळा लवकरच सुरू होणार असा अंदाज हवामान विभागाने दिल्याने तलावाचे काम लवकर होण्याच्या दृष्टीणे आ. तान्हाजी मुटकुळे यांनी (Hingoli Jaleshwar lake) तलावाच्या कामाला भेट देऊन पाहणी केली.
हिंगोली शहरातील जून्या भागामध्ये मागील अनेक वर्षानंतर पहिल्यांदा हे मोठ्या प्रमाणात विकासाचे काम सुरू झाले आहे. (Hingoli Jaleshwar lake) जलेश्वर तलावाचे सुशोभिकरण करण्याकरीता शासन स्तरावरून कोट्यावधी रुपयाचा निधी प्राप्त झाल्याने तलावातील हजारो हेक्टर गाळ उपसा टिप्पर, ट्रॅक्टर व जेसीपीच्या माध्यमातून काढण्यात आला आहे.
यासोबतच तलावाचे खोलीकरण करून अंतर्गत कामे आणि (Hingoli Jaleshwar lake) तलावाच्या चोही बाजूने संरक्षण भिंत विद्युत रोषणाई केली जात आहे. पावसाळा लवकरच सुरू झाला असल्याने त्यापूर्वी जलेश्वर तलावाचे काम पुर्ण करावे या उद्देशाने आ. तान्हाजी मुटकुळे यांनी नुकतीच भेट देऊन कंत्राटदाराला काही मार्गदर्शक सूचना केल्या. अॅड. के. के. शिंदे यासह इतरांची उपस्थिती होती.