हिंगोली लोकसभा निवडणूक
हिंगोली (Hingoli) : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय हिंगोली यांच्यातर्फे (Hingoli LokSabha) निवडणूक कामासाठी जवळपास 555 वाहने अधिग्रहीत करण्यात आली आहेत. यातील (Vasmat Assembly) वसमत विधानसभा मतदारसंघासाठी विविध मतदान पथके यांच्यासाठी जवळपास 145 वाहने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक तडवी, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक पारशेट्टी व विजय दिघे यांच्या पथकाने उपलब्ध वाहने अधिगृहीत केली आहेत. वरीलपैकी सर्व वाहने (Vasmat Assembly) वसमत सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाचे आवारात दाखल देखील झाली आहेत, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी दिली आहे.