हिंगोली (Hingoli Mahavitaran) : महावितरण वीज ग्राहकांना तत्पर वीज सेवा देण्याबरोबरच मागेल त्यांना वीज जोडणी देण्यासाठी सज्ज आहे. याचाच भाग म्हणून महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत मराठवाडयात एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत गेल्या नउ महिन्यात सर्व वर्गवारीतील ९२,१०९ ग्राहकांना नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात ३१७७ नविन जोडण्या देण्यात आल्या आहेत.
नवीन वीज जोडणीसाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रासह (Hingoli Mahavitaran) महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरण कंपनी वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमूख तत्पर सेवा देण्यासाठी सज्ज आहे. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी यांनी नव्या वीज जोडणीचे अर्ज तातडीने निकाली काढण्याचा आदेश कार्यक्षेत्रातील क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत.
ग्राहकांनी नव्या वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतर (Hingoli Mahavitaran) महावितरणचे कर्मचारी स्थळ अर्थात जागेची पाहणी करून किती शुल्क भरायचे याची माहिती देतात. त्यानुसार पायाभुत सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी शहरी भागातील ज्या ग्राहकांनी शुल्क भरले त्यांना २४ तासात तर ग्रामीण भागात ४८ तासात वीज जोडणी देण्यावर भर देण्यात आला. वीज जोडणी आवश्यक असल्यास त्या ठिकाणच्या जागेवर वीज बिलाची थकीत थकबाकी नसली पाहिजे. वीज चोरीचा दंड प्रलंबित असू नये. नागरिकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करावा. आकडे टाकून व इतर मार्गाने अनधिकृत विजेचा वापर करू नये.
नवीन वीज जोडणीसाठी दलाल अथवा मध्यस्थाशी संपर्क साधू नये व त्यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. नागरिकांनी वीज जोडणीसाठी आवश्यक कागदपत्रां सह जवळच्या (Hingoli Mahavitaran) महावितरणच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे. मंडल कार्यालय तर्फे करण्यात आलेल्या नवीन जोडण्या जिल्हा निहाय पुढील प्रमाणे- छत्रपती संभाजीनगर शहर ९,८५३, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण १६,२४८, जालना ९,२८८, छत्रपती संभाजीनगर परिमंडल ३५,३८९, बीड ९,१८०, धाराशिव ९,९८८, लातूर १५,९३७, लातूर परिमंडल ३५,१०५, हिगोंली ३,१७७, नांदेड १४,३५४, परभणी ४०,८४, नांदेड परिमंडल २१,६१५,मराठवाडा एकूण ९२,१०८ देण्यात आल्या आहेत.