हिंगोली (Hingoli Mahavitaran) : शहरातील तापडीया इस्टेट (एनटीसी) मधील वीजपुरवठा (Power supply) वारंवार खंडीत होत आहे. ऐन रात्रीच्या वेळी वीज गूल होत असल्याने रात्र अंधारात काढावी लागत आहे. यासंदर्भात (Hingoli Mahavitaran) महावितरणच्या कार्यालयास नागरिकांनी वारंवार विनंती, तक्रार देवूनही कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. सदरील महावीर उद्यान परिसरात एकच डीपी उपलब्ध असल्यामुळे सर्व भार एकाच डीपीवर येत असल्याने वारंवार वीजपुरवठा (Power supply) खंडीत होत आहे.
हिंगोलीतील नागरिकांनी ठिय्या आंदोलनाचा दिला इशारा
या भागात सर्व प्रतिष्ठीत व्यापारी, अधिकारी, डाॅक्टर्स, कर्मचारी वर्ग वास्तव्यास आहेत. ते सर्व वीजबिल नियमित व वेळेत भरतात. तरी पण वीजपुरवठा मात्र सुरळीत केला जात नाही. त्यामुळे या भागातील नागरिक वैतागले असून, या भागातील वीजपुरवठा (Power supply) तातडीने सुरळीत करावा, अन्यथा आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला या संदर्भात विद्युत महावितरण चे अधीक्षक अभियंता चव्हाण यांची भेट या भागातील नागरिकांनी घेतली असता येत्या दोन दिवसात महावीर उद्यान येथे नवीन डीपी बसविण्याचे आश्वासन चव्हाण दिले आहे.
या शिष्टमंडळात डॉ. आशुतोष माहुरकर, डॉ. गजानन जाधव, धीरज शर्मा, बकरे मामा, महेंद्र आचलिया, केशव दुबे,आशिष पोरवाल,स्वप्निल आप्पा,महेश साहू, सुमित जैन, सचिन काळे,काशिनाथ गवळी, बालाजी बांगर , मुदिराज अण्णा, आशिष रुणवाल, धनंजय टेहरे, प्रसाद ढोके, निलेश साहू यांच्यासह एन टी सी भागातील अनेक नागरिकांची उपस्थिती होती.