हिंगोली (Hingoli Mahavitaran) : हनवतखेडा, कडती, चांगेफळ या ठिकाणी झालेल्या वादळी वार्यासह (Unseasonal rain) अवकाळी पावसामुळे विजेचे खांब पडले होते. तसेच वीज वाहिन्या तुटल्या होत्या. या संदर्भात महावितरणकडे डॉ. रमेश शिंदे केसापुरकर यांनी पाठपुरावा करून सुद्धा त्याकडे कानाडोळा केला जात असल्याने अनेक शेतकरी जनावरांसह नर्सी नामदेव ३३ के.व्ही. उपकेंद्रासमोर (thiiya Andolan) ठिय्या आंदोनाला बसताच (Hingoli Mahavitaran) महावितरणने विजेच्या कामास सुरूवात केली.
कडती, चांगेफळ, हनवतखेडा या ठिकाणी १० एप्रिल रोजी (Unseasonal rain) वादळी वार्यासह गारपीट झाली होती. त्यामुळे या ठिकाणी रोहित्र व विद्युत खांब पडले होते. या गावामध्ये उच्च दाब वाहिनीचे एकूण ६०, लघु दाब वाहिनीचे १५० खांब आणि कृषी पंपाचे २८ वितरण रोहित्र पडून महावितरणच्या कंपनीच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या संदर्भात डॉ.रमेश शिंदे केसापुरकर यांनी वारंवार महावितरणकडे पाठपुरावा करून निवेदन दिले होते. जवळपास दोन महिने उलटले तरी (Hingoli Mahavitaran) महावितरणकडून या कामाकडे कानाडोळा केला जात होता. अखेर या प्रश्नी ७ जूनला नर्सी नामदेव ३३ के.व्ही. उपकेंद्रासमोर शेतकरी जनावरांसह ठिय्या आंदोलनाला बसले होते. घटनास्थळी महावितरणचे कार्यकारी अभियंता ए.ए.मोरे, उपकार्यकारी अभियंता बेलसरे, तालुका अभियंता कोळपे यांनी भेट दिली असता शेतकर्यांनी त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार केला. त्यानंतर महावितरणच्या अधिकार्यांनी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधून तात्काळ कामाला सुरूवात करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे १३२ विजेचे खांब, विजेचे साहित्य आदी घटनास्थळी नेण्यात आले. तसेच (Mahavitaran) महावितरणचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
या (thiiya Andolan) ठिय्या आंदोलनात रमेश शिंदे, दामू अण्णा जाधव दत्तराव जाधव माजी उपसभापती, राजू जाधव सरपंच, दत्तराव पडोळे, पुंडलिक जाधव दिलीप जाधव, बबन पडघन,पडघन, दत्तराव जाधव, बाबाराव जाधव, ज्ञानबा पडोळे, वामन भोपाळे, शिवाजी भोपळे, केशव मुटकुळे, जयराम मुटकुळे, विनायक जाधव, बबन जाधव, साईराम जाधव, साई राम पवार, गणेश जाधव यांच्यासह इतर शेकडो शेतकरी बैल जोड्या सहित सहभागी झाले होते.