मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नर्सी ना. येथे महाअभिषेक
हिंगोली (Manoj Jarange Patil) : मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त १ ऑगस्ट रोजी विविध उपक्रम राबवुन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नरसी नामदेव येथे ५९० रक्तदात्यांनी रक्तदान करून ज्ञानदिप कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नर्सी नामदेव येथे वृक्षारोपण, शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रमाचे नियोजन मराठा सेवक डॉॅ. रमेश शिंदे व सकल (Maratha society) मराठा समाज बांधवांनी केले होते.
हिंगोली तालुक्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या वाढदिवसानिमित्त १ ऑगस्ट रोजी डॉ. रमेश शिंदे व त्यांच्या सकल (Maratha society) मराठा समाज बांधवाच्या वतीने रक्तान शिबीर नर्सी नामदेव येथे आयोजित करण्यात आले होते. या (Blood Donation) रक्तदान शिबीरात तब्बल ५९० रक्तदात्यांनी रक्तदान केले तर नर्सी नामदेव येथील शासकीय रुग्णालय येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले. तसेच नर्सी नामदेव येथील ज्ञानदिप कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम घेवुन मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त झाडे जगविण्याचा संकल्प ही यावेळी करण्यात आला. तसेच राष्ट्रसंत नामदेव महाराज यांच्या चरणी महाअभिषेक करण्यात आला.
यावेळी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आयुष्यात सुख समृध्दी, समाधानी लाभो अशी प्रार्थना राष्ट्रसंंत नामदेव महाराज यांच्या चरणी करण्यात आली. या प्रसंगी डॉ. रमेश शिंदे, मनोज आखरे, माधवराव कोरडे. डॉ. विठ्ठल रोडगे, दाजीबा पाटील, नागेश गायकवाड, नाथराव कदम, बद्रीनाथ घोंगडे, एकनाथ शिंदे भागवत सोळंके, दत्तराव जाधव, ज्ञानेश्वर कीर्तनकार, केदार शिंदे,कैलास टेकाळे, धामोधर शिंदे, अशिफ पठाण, सरपंच, राम शिंदे, सुनाल जगताप, सुरेश शिंदे, बालाजी वानखेडे, बाळू वाबळे, यांच्यासह मोठ्या संख्येने सकल (Maratha society) मराठा समाज बांधव उपस्थित होते.