हिंगोली (Hingoli Mashal Yatra ) : आज दि. 31 /8 /20 25 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सभागृह जि. हिंगोली येथून बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, ही प्रमुख मागणी पूर्ण व्हावी यासाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते होते, डॉ. आंबेडकर स्मारक समिती सभागृहाच्या प्रांगणात दिवाकर माने यांनी मशाल प्रज्वलित करून रॅली ची सुरुवात केली.
या मशाल रॅलीमध्ये भन्ते नाग धम्मरक्षित, भदंत बुद्धकीर्ती, भन्ते सारीपुत्र नागसेन, श्रामनेर नागसेन,जयंती बौद्ध, सहभागी झाले होते ही (Hingoli Mashal Yatra) मशाल रॅली आंबेडकर स्मारक येथून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, संविधान कॉर्नर, आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.
ही (Hingoli Mashal Yatra) मशाल रॅली यशस्वी करण्यासाठी योगेश नरवाडे, एडवोकेट आनंद खिल्लारे, राजकुमार सरतापे, लखन खंदारे, पांडुरंग पाईकराव, गोविंद जाधव, कपिल इंगोले, राजरत्न बगाटे, भारत गडधने, श्रीरंग तपासे, शांताबाई धाबे, रुक्मिणीबाई इंगोले, हरणाबाई इंगोले, रुपेश केळे, शुभम पाईकराव, जयवंत वाढे,शेख खाजा, लखन सरतापे, गोपाल हनवते, जयश्रीताई इंगोले जयश्रीताई इंगोले, छायाबाई पाईकराव, महानंदा धबाले, भगीरथाबाई जोंधळे, शितल घोडके, बाळू वाढे इत्यादी सहभागी झाले होते.




