हिंगोली (Hingoli Medical College) : हिंगोलीकरांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे १० ऑक्टोबर रोजी उद्घाटन होणार आहे. वैद्यकीय प्रवेशाच्या तिसर्या फेरीच्या यादीत हिंगोलीचे नावही जोडण्यात आले आहे. हिंगोलीसहीत राज्यातील एकूण दहा (Hingoli Medical College) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उद्घाटन करणार आहेत. या ‘डिजीटल’ उद्घाटन समारंभाला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री या कार्यक्रमाला ‘ऑनलाईन’ उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात या उद्घाटनासाठी हिंगोली जिल्ह्यातील खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी (Hingoli Medical College) वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले होते. इतर जिल्ह्यांचे महाविद्यालय सुरू झाले; परंतु तत्कालीन प्रशासन व पुढार्यांच्या उदासीनतेमुळे हिंगोलीचे महाविद्यालयाचे दोन वर्ष रखडले. यंदाही केंद्रशासनाच्या अखत्यारितील ‘नॅशनल मेडिकल कॉन्सिल’ च्या समितीने महाविद्यालयाला मंजुरी नाकारली होती. हा विषय देशोन्नतीने उजेडात आणल्यानंतर हिंगोलीकरांनी वज्रमूठ बांधली व आंदोलनाचा इशारा दिला. या इशार्यानंतर राज्यशासनाने हिंगोलीच्या शासकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या प्राध्यापकांची व्यवस्था केली.
शिवाय केंद्रशासनाकडे महाविद्यालयाला सर्व सुविधा पुरविण्याचे हमीपत्रही दिले. जनरेट्यामुळे मंजूर झालेल्या या (Hingoli Medical College) महाविद्यालयाचे बुधवारी ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. राज्य व केंद्राच्या मंत्रीमंडळातील सदस्य या उद्घाटनाला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत तर स्थानिक लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करण्यात आले आहे. वैद्यकीय प्रवेशाच्या तिसर्या फेरीत महाविद्यालयांच्या यादीत हिंगोलीचे नाव आता प्रवेशसाठी असलेल्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पोर्टलवर दिसत आहे.
यादीत आले हिंगोलीचे नाव
वैद्यकीय प्रवेशाची तिसरी फेरी शिल्लक असून त्यापूर्वी महाविद्यालयांच्या यादीत (Hingoli Medical College) हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नावही जोडण्यात आले आहे. शंभर विद्यार्थी क्षमता असलेल्या या महाविद्यालयात शासकीय नियमानुसार १५ विद्यार्थी अखिल भारतीय गुणवत्ता यादीतून आणि ८५ विद्यार्थी राज्यातून प्रवेश घेऊ शकणार आहेत.