– अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड
हिंगोली (Hingoli milk production) : जिल्ह्यात दूधाचे उत्पादन व संकलन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी आढावा बैठकीत केले.
जिल्ह्यातील दूध संकलनाचे (Hingoli milk production) प्रमाण व वितरण वाढविण्यासाठी तसेच दुधातील भेसळ थांबविण्यासाठी प्रतिबंधकात्मक उपाययोजना करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा दूग्ध व्यवसाय विकास अधिकारी शिवाजी गिनगिने, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पुणे, सहायक आयुक्त डॉ. कल्यापूरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुणे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे चौधरी यांची उपस्थिती होती.
दूध उत्पादनात (Hingoli milk production) वाढ करणे, उत्पादित होणारे सर्व दूध संकलीत करणे. ज्या गावात दूध संकलन केंद्र नाहीत त्या गावामध्ये दूध संकलन केंद्र सुरु करावेत. दूध संकलन केंद्रामुळे त्या गावात उत्पादित होणाऱ्या दुधास बाजारपेठ उपलब्ध होईल आणि त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल. शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिध्दी करुन त्यांना योजनेतून दुधाळ जनावरे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांकडे असलेल्या गायी-म्हशीचे दूध उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना जंतनाशकाचे महत्व, चाऱ्याचे नियोजन व विनियोजनाबाबत मार्गदर्शन करावे. जनावरांना खुराक देण्याविषयी मार्गदर्शन करावे.
दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी (Hingoli milk production) दुग्ध विकास विभाग व बँकेच्या समन्वयातून शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप करावे. तसेच बचत गटांच्या महिलांनाही दुधाळ जनावराचे वाटप करावेत. दुधाळ जनावरांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक गावात शिबिरे घेऊन प्रबोधन करावेत. दुधाळ जनावरांचे खाद्य, दूध उत्पादन आणि व्यवस्थापनावर विशेष लक्ष द्यावेत, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी माचेवाड यांनी यावेळी दिल्या.
तसेच दूध, पनीर किंवा इतर दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ थांबविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, दुग्धविकास विभाग, पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागांनी समन्वयाने काम करावे. आगामी येणाऱ्या रमजान ईद सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर दुधाची आवश्यकता भासते. याप्रसंगी दुधात कुठलीही भेसळ होणार नाही याची खबरदारी घ्यावी. दूध भेसळ थांबविण्यासाठी पथक नेमून धाडी टाकावेत. दुधाचे नमुने घ्यावेत. जे नमुने भेसळयुक्त आढळून येतील त्यांच्यावर कार्यवाही करावी, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.
या बैठकीस खाजगी (Hingoli milk production) दूध संकलन केंद्र हेरिटेज डेअरी, साई डेअरी, विजापुरी दूध डेअरी यांचे संचालक, जिल्ह्यातील सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. बुचाले, डॉ. निश्चल, डॉ. राठोड, डॉ. मुस्तरे, डॉ. ऊके तसेच पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ.इंगोले, डॉ. पारवेकर, डॉ. देवकर, डॉ.नरवाडे व डॉ. नाईक उपस्थित होते.