हिंगोली (Hingoli):- मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीकरिता दि.६ जुलै रोजी लाखो मराठा पुरुष व महिला करिता सकल मराठा वैद्यकीय तज्ञ(medical specialist) (डॉक्टर्स) च्या वतीने सेवा देण्यात येणार आहे. रॅलीकरिता सात रुग्णवाहिका(Ambulance) व दोन आरोग्य कक्ष उभारण्यात येणार आहेत. यामध्ये तज्ञ डॉक्टर औषधसाठयासह उपलब्ध असणार आहेत. याशिवाय शहरातील तीन मोठे हॉस्पिटल रॅलीच्या दिवशी मोफत सेवा देणार आहेत.
दि.६ जुलै रोजीच्या रॅलीकरिता जय्यत तयारी
सकल मराठा समाज जिल्हा हिंगोलीच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत होत असलेल्या दि.६ जुलै रोजीच्या रॅलीकरिता जय्यत तयारी करण्यात येत आहे. लाखो मराठा पुरुष व स्त्री या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. याकरिता रविवार दि.३० जुन रोजी शासकीय विश्रामगृहात(Government Rest House) मराठा शिक्षक(Teacher), प्राध्यापक(professor), शासकीय, निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर्स, केमिस्ट बांधवाच्या बैठका संपन्न झाल्या. या बैठकीत शिक्षक व शासकीय कर्मचार्यांनी एक दिवसाची रजा घेऊन सहकुटूंब सहभागी होणार असल्याचे जाहिर केले. याच बरोबर शिक्षकवृंदानी रॅली दरम्यान शिस्त ठेवण्यासाठी गणवेशात सेवा देणार असल्याचे सांगितले. हिंगोली शहरातील सर्व महापुरुषांना रॅलीच्या दिवशी अभिवादन(greetings) करण्यात येणार आहे.
रॅलीतील लाखो लोकांसाठी आरोग्य सेवा
डॉक्टर्स व केमिस्ट मराठा बांधवाच्या वतीने रॅलीतील लाखो लोकांसाठी आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. केमिस्ट मराठा च्या वतीने मोफत औषधे आरोग्य कक्षाला पुरविण्यात येणार आहे. शहरातील रॅलीस्थळा जवळील सहयाद्री हॉस्टिपल एनटीसी डॉ.यशवंत पवार, देशमुख हॉस्पिटल शिवाजी नगर डॉ.जयदिप देशमुख, माऊली हॉस्पिटल नारायण नगर डॉ.विठ्ठल रोडगे व नवजीवन हॉस्पिटल एनटीसी डॉ. जगन्नाथ जारे या चार रुग्णालयात रॅलीतील लोकांकरिता मोफत सेवा देण्यात येणार आहे. रॅली मार्गात दोन आरोग्य कक्ष उभारण्यात येणार आहेत. यामध्ये पहिला कक्ष सिटी क्लब मैदान परिसर व दुसरा कक्ष समारोप इंदिरा गांधी चौकाजवळील पेट्रोलपंपासमोर उभारला जाणार आहे. या कक्षात डॉ.विनोद शिंदे, पुरुषोत्तम काळे, डॉ.हरिष काळे, राजेश शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्यासह वैद्यकीय तज्ञ सेवा देणार आहेत. तर दुसर्या आरोग्य कक्षात डॉ.लक्ष्मण पठाडे, डॉ.जयदिप देशमुख, डॉ.अनिल इंगळे, जगन टेकाळे, गणेश गरड आदी सेवा देण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. याशिवाय शासकीय रुग्णालयाकडून सातवाहिका व आरोग्य पथके कक्षात सेवेसाठी असणार आहेत. रुग्णवाहिका दोन्ही आरोग्य कक्षासह आखरे मेडिकल, पोस्ट ऑफिस रोड, महात्मा गांधी चौक, रामलिला मैदान व रॅली मार्गावर तैनात असणार आहेत. याशिवाय डॉ.नामदेव कोरडे, डॉ.कैलास कोटकर, डॉ.श्याम जाधव, डॉ.अनिल इंगळे, डॉ.हरिष काळे, डॉ.विनोद शिंदे, डॉ.गणेश अंभोरे, केमिस्ट चक्रधर भवर, हारिपाल भवर याच्यासह जिल्हयातील वैद्यकीय तज्ञ रॅली दरम्यान सेवा देणार आहेत.