हिंगोली (Hingoli):- औंढा तालुक्यातील लाख येथील जैन मंदिराच्या सभामंडपासाठी आमदार संतोष बांगर यांनी दहा लाखाच्या निधीची घोषणा केली.
आमदाराने केली मंदिरासाठी १० लाखांची घोषणा
आमदार संतोष बांगर (Santosh Bangar)दुसर्यांदा विजयी सलग दुसर्यांदा विजयी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम, राम नागरे, माजी सभापती फकीरा मुंडे, निश्चल यंबल यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात सुमित महाजन यांनी आमदार बांगर यांचा सत्कार केला. यावेळी आदर्श अमित महाजन या चिमुकल्याने आमदार बांगर यांचे काढलेले स्केच भेट दिले. यावेळी आमदार बांगर यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली. त्यावर तातडीने आ. बांगर मंदिरासाठी दहा लाखाचा निधी (Fund)घोषित केला.
यावेळी कुलदिप मास्ट, जिनेंद्र महाजन, संजय दोडल, रत्नाकर महाजन, संदिप महाजन, नेमिनाथ वरवंटे, महावीर देगावकर, बाळासाहेब देगावकर, रतन देगावकर, संजय देगावकर, गजानन कल्याणकर, प्रणय परतवार, सुदर्शन महाजन आदींची उपस्थिती होती.