हिंगोली (Hingoli Municipal Council) : नगर परिषद हिंगोली तर्फे माझी वसुंधरा 4.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2024, या अभियानाची अंमलबजावणी संपूर्ण हिंगोली शहरात नगर परिषदेचे कर्तव्यदक्ष प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. श्री. अरविंदजी मुंढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या अनुषंगाने प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्या संकल्पनेतून विविध स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा आज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे.
यामध्ये (Hingoli Municipal Council) प्रामुख्याने भित्तीचित्रे स्पर्धा,जिंगल स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा,पोस्टर/चित्रकला स्पर्धा,शॉर्ट मुव्ही स्पर्धा,स्वच्छ वॉर्ड रँकींग स्पर्धा,टॉयकॅथॉन स्पर्धा (टाकाऊ वस्तूंपासून खेळणी तयार करणे),तसेच स्वच्छता हि सेवा अंतर्गत महिलांकरिता रांगोळी स्पर्धा व जेष्ठ नागरिकांकरिता जेष्ठ नागरिक वॉकिंग स्पर्धा ई. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. घेण्यात आलेल्या सर्व स्पर्धेस हिंगोली शहरातील नागरिकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे व जवळपास 250 च्या वर स्पर्धकांनी सदर आयोजित स्पर्धेमध्ये भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बाजवली आहे.सदर स्पर्धा आयोजित करण्याचे कारण हेच की, नागरिकांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा व नगर परिषद मार्फत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या अभियानामध्ये नागरिकांनी सहभाग घ्यावा.नागरिकांचा सहभाग हा खूप महत्वाचा आहे.यामुळेच हिंगोली नगर परिषदेचे नावलौकिक हे स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान यामध्ये देशपातळीवर प्रत्येक वर्षी झाले आहे.
सदर कार्यक्रमाचे (Hingoli Municipal Council) अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी श्री. समाधानजी घुटूकडे यांच्या हस्ते व मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अरविंदजि मुंढे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यात आला.तसेच कार्यक्रमाची सुरुवात हि वसुंधरेचे संवर्धन व संगोपन करणेकरिता सर्वांनी उभे राहून हरित शपथ घेतली.यामध्येभित्तीचित्रे स्पर्धा (15 वर्षा खालील) गटामध्ये आरुष संदीप जैस्वाल – प्रथम बक्षिस 4001/ – व प्रमाणपत्र ,प्रतिक महेंद्र धाबे आणि जानव्ही नितीन हजारे – द्वितीय बक्षिस 3001/ – व प्रमाणपत्र ,शिवराज आनंद शेळके – तृतीय बक्षिस 2001/- व प्रमाणपत्र भित्तीचित्रे स्पर्धा (15 वर्षा वरील ) गटामध्ये विष्णू जायभाये – प्रथम बक्षिस 10001/- व प्रमाणपत्र,सदानंद रत्नपारखे – द्वितीय बक्षिस 8001/- व प्रमाणपत्र,किरण दत्तराव कुऱ्हे – तृतीय बक्षिस 5001/- व प्रमाणपत्र लघु चित्रफित (शॉर्ट मुव्ही) गटामध्ये रमेश सुरेश सांडवे – प्रथम बक्षिस 7001/ – व प्रमाणपत्र,चारुशील माने – द्वितीय बक्षिस 5001/ – व प्रमाणपत्र,विश्वजित बापूराव घोडगे – तृतीय बक्षिस 4001/- व प्रमाणपत्र,पूनम माने – प्रोत्साहनपर 1001/- व प्रमाणपत्र,जिंगल स्पर्धा (धून स्पर्धा ) गटामध्ये स्वप्नील सतीश दुरगकर – प्रथम बक्षिस 7001/ – व प्रमाणपत्र,शंतनू अंकुशराव पोले – द्वितीय बक्षिस 5001/ – व प्रमाणपत्र,उर्मिला गजानन जगताप – तृतीय बक्षिस 3001/ – व प्रमाणपत्र,प्रीयांशा श्रीधर दायमा – प्रोत्साहनपर 1001/- व प्रमाणपत्र पथनाट्य स्पर्धा गटामध्ये शाहीर इंगोले अँड पार्टी – प्रथम बक्षिस 6001/ – व प्रमाणपत्र,विजय ठाकरे अँड टीम – द्वितीय बक्षिस 5001/ – व प्रमाणपत्र,शिवाजी महाविद्यालय हिंगोली – 3001 /- व प्रमाणपत्र टॉयकॅथॉन स्पर्धा गटामध्ये आशिष सदाशिव मस्के – प्रथम बक्षिस 5001/ – व प्रमाणपत्र ,मुकेश दिलीप डहाळे – द्वितीय बक्षिस 3001/ – व प्रमाणपत्र,संस्कार गजानन जवंजाळे – तृतीय बक्षिस 2001/- व प्रमाणपत्र पोस्टर / चित्रकला (15 वर्षा खालील) स्पर्धा गटामध्ये श्रेयस दिलीप धामणे – प्रथम बक्षिस 2001/ – व प्रमाणपत्र ,कृतिका संतोष शिंदे – द्वितीय बक्षिस 1501/ – व प्रमाणपत्र ,सिया परमेश्वर जावळे – तृतीय बक्षिस 1001/- व प्रमाणपत्र पोस्टर / चित्रकला (15 वर्षा वरील) स्पर्धा गटामध्ये अमोल पेभाकार सालमोठे – प्रथम बक्षिस 5001/ – व प्रमाणपत्र,दुरसिंग पंडित बरेला – द्वितीय बक्षिस 3001/ – व प्रमाणपत्र ,किरण दत्तराव कुऱ्हे – तृतीय बक्षिस 2001/- व प्रमाणपत्र रांगोळी स्पर्धा गटामध्ये (फक्त महिलांकरिता) वंदना नारायण भेणे – प्रथम बक्षिस 4000/ – व प्रमाणपत्र ,सुहासिनी वानखेडे – द्वितीय बक्षिस 1500/ – व प्रमाणपत्र (3000 विभागून)दोघांमध्ये,पूजा प्रमोद वाघमारे – द्वितीय बक्षिस 1500/ – व प्रमाणपत्र ,करुणा चौधरी – तृतीय बक्षिस 2000/- व प्रमाणपत्र,सायली धनराज भूसांडे – प्रोत्साहनपर 500/- व प्रमाणपत्र,चांदणी कुरील – प्रोत्साहनपर 500/- व प्रमाणपत्र,रिया गडाले – प्रोत्साहनपर 500/- व प्रमाणपत्र,गोदावरी कदम – प्रोत्साहनपर 500/- व प्रमाणपत्र,श्रुती लोलगे – प्रोत्साहनपर 500/- व प्रमाणपत्र सिनियर सिटीजन वॉकिंग स्पर्धा महिला गटामध्ये कांता कल्याणकर – प्रथम बक्षिस सन्मानचिन्ह – व प्रमाणपत्र ,शीतल तापडीया – द्वितीय बक्षिस सन्मानचिन्ह – व प्रमाणपत्र ,पुष्पा बांगर – द्वितीय बक्षिस सन्मानचिन्ह – व प्रमाणपत्र सिनियर सिटीजन वॉकिंग स्पर्धा पुरुष गटामध्ये विजेते आहेत बाळासाहेब हरण – प्रथम बक्षिस सन्मानचिन्ह – व प्रमाणपत्र,कलानंद जाधव – द्वितीय बक्षिस सन्मानचिन्ह – व प्रमाणपत्र ,बाबुराव ढोकणे – द्वितीय बक्षिस सन्मानचिन्ह – व प्रमाणपत्र स्वच्छ वॉर्ड रँकींग स्पर्धा अंतर्गत शासकीय कार्यालय प्रथम क्रमांक समाज कल्याण ऑफिस , द्वितीय क्रमांक जिल्हा कोषागार कार्यालय , तृतीय क्रमांक सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय,स्वच्छ शाळामध्ये प्रथम क्रमांक सॅक्रेड हार्ट इंग्लिश स्कूल, द्वितीय क्रमांक विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल, तृतीय क्रमांक ग्लोबल पब्लिक स्कूल , स्वच्छ हॉस्पिटल गटामध्ये प्रथम क्रमांक शिवम मल्टीस्पेसीआलिटी हॉस्पिटल, द्वितीय क्रमांक लक्ष्मि लाईफ केअर हॉस्पिटल , तृतीय क्रमांक सह्याद्री हॉस्पिटल, स्वच्छ क्लिनिक गटामध्ये आदित्य स्कीन केअर क्लिनिक, स्वच्छ हॉटेल गटामध्ये प्रथम क्रमांक निर्मल कॅफे अँड रेस्टराँ , द्वितीय क्रमांक शिवम स्नॅक्स & रेस्टॉरंट, तृतीय क्रमांक हॉटेल श्रीनिवास यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी (Hingoli Municipal Council) नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी प्रकाश साबळे,शाम माळवटकर,प्रभारी नगर अभियंता प्रतिक नाईक,लेखापाल अनिकेत नाईक,देवीसिंग ठाकूर,बाळू बांगर,पंडित मस्के,काझी,आशिष रणसिंगे,विजय रामेश्वरे,पवीन चव्हाण,बाबुराव काळे,शेख साजिद,गजानन जगताप,आकाश गायकवाड,रवी जोंधळे,चेतन भूजवने,कुणाल कांबळे,अथर्व वर्मा,अजय मांडले नगर परिषद अधिकारी कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विजेते, नागरिक उपस्थित होते.