नगर परिषदचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनात सुरु
हिंगोली (Hingoli municipal council) : शहराजवळ असलेल्या गणेशवाडी भागासह इतर शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लोकसभा व विधान सभेच्या निवडणुकीत अधिकारी, कर्मचारी गुंतलेले होते; मात्र निवडणूक संपताच गणेशवाडी भागातील अतिक्रमणावर नगर परिषद हिंगोली यांनी २ डिसेंबर मंगळवार रोजी जेसीबीने हातोडा चालवून अतिक्रमण हटविण्यात आले.
हिंगोली शहरातील (Hingoli municipal council) अनेक भागात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारावरची कसरत करावी लागत आहे. मागील सात ते आठ महिन्यापूर्वी नगर पालिकेने काही भागातील अतिक्रमण हटविले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागली. तसेच आठ दिवसापूर्वी विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर हिंगोली शहरातील अतिक्रमणाकडे नगर पालिकेने लक्ष देत हा मोर्चा हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागाकडे वळविला आहे.
हिंगोली शहराजवळ असलेल्या गणेशवाडी मधील रस्त्याच्या कामामधील अतिक्रमण काढण्याची निवडणुकीनंतर बर्याच दिवसापासुन प्रलंबित गणेशवाडी मधिल रस्त्याच्या कामामधिल अतिक्रमण काढण्याची मोहीम नगर पालिकेने हाती घेतली आहे. यावेळी नगर अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर व ईतर कर्मचारी उपस्थित होते. (Hingoli municipal council) मोहीम नगर पालिकेने हाती घेतली आहे. यावेळी नगर अभियंता प्रतिक नाईक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर व ईतर कर्मचारी उपस्थित होते.